शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, आशिया खंडातील सर्वात मोठा रोप-वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:30 IST

माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे.

मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप-वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉइंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे.माथेरानच्या पायाभूत सुविधेसाठी आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होण्यासाठी सरकार दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाली नव्हती. त्यामुळे मागील काही काळात स्थानिक हॉटेलमालकाने रोप-वे सुरू होण्यासाठी केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केला होता. त्यानंतर स्थानिकांच्या सततच्या मागणीवरून अखेरीस रोप-वे सुरू करण्यास केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आहे. येथील मुख्य थांबा असलेल्या नौरोजी उद्यानातील माधवजी पॉइंटच्या दर्शनी भागात मातीच्या परीक्षणासाठी उत्खनन सुरू केले आहे.रोप-वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या पर्यटनस्थळाला आणखी चालना मिळणार आहे. रोप-वेने एका वेळेस ८० पर्यटक ये-जा करू शकतात. आशिया खंडातील हा सर्वात मोठा रोप-वे बनणार असून, याची लांबी १७०० मीटर आणि उंची अडीच हजार फूट आहे. कर्जत-भूतिवली-गार्बट पठार मार्गे माधवजी पॉइंटपर्यंतच्या या दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासात पर्यटकांना विविध पॉइंट्स आणि निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान न्याहाळत गाठता येणार आहे.टाटा समूह रोप-वे बनवण्यासाठी माथेरान नगरपालिकेची आणि वनविभागाची जागा व्यापणार आहेत. यामध्ये अनेक झाडांची कत्तल होणार आहे. त्याचप्रमाणे हेरिटेज असलेले माधवजी उद्यानातील बहुतांश जागा रोप-वे मधून उतरल्यावर पर्यटकांना वापरावी लागणार आहे. त्यामुळे उद्यानात फिरावयास आलेल्या अन्य पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.>माधवजी पॉइंट येथे छोटे स्टॉल्स लावून आम्ही पाच - सहा जण व्यवसाय करीत आहोत. यावर आमच्या कुटुंबाची गुजराण होत आहे. आमच्या स्टॉल्सच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून त्यामुळे आम्ही बेरोजगार होऊ. नगरपालिकेने तसेच रोप-वेच्या समूहाने काहीतरी पर्यायी रोजगाराची अथवा प्रकल्पात काम देण्याची व्यवस्था करावी.- मयूर कदम,स्टॉल्सधारक, माथेरान>माथेरानचा विकासात्मकदृष्ट्या रोप-वे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे; परंतु प्रकल्पात प्रामुख्याने स्थानिक बेरोजगारांना काम देण्यासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. रोप-वेमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून, रोजगारात भर पडणार आहे. व्यवसाय वृद्धिंगत होऊन आपोआपच पर्यटनक्र ांती घडेल.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

टॅग्स :Matheranमाथेरान