शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगड परिसरात उत्खनन, वनविभागाने थांबविले काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:50 IST

Raigad News : किल्ले रायगड परिसर हा वनसंपदेमुळे परिपूर्ण आहे. अशा वन परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन सुरू आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : किल्ले रायगड परिसर हा वनसंपदेमुळे परिपूर्ण आहे. अशा वन परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन सुरू आहे. याचा धोका रायगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला आणि पर्यावरणाला होण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या जमिनीशेजारीच हे उत्खनन सुरु असल्याने हे काम सध्या थांबवले असल्याचे वनविभागाच्या वनपालांनी सांगितले.किल्ले रायगड हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. घनदाट वनांनी व्यापलेला परिसर आज रायगड संवर्धनाच्या कामात मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  नेवाळी परिसरात रायगड संवर्धनासाठी लागणाऱ्या दगडासाठी उत्खनन केले जात आहे. याकरिता या जमिनीवर यांत्रिक साधनांचा वापर करून उत्खनन केले जात आहे. यातील दगड काढून मूळ जमीन मालकाला सपाटीकरण करून देण्याचे ठरले असल्याचे येथे काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितले. किल्ले रायगडाच्या वाघोली खिंड आणि हिरकणीवाडी दरम्यान हे उत्खनन होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड महसूल, वनविभागाकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर महसूल विभाग जागा झाला आहे. महाड महसूल विभागाच्या तलाठ्यांनीही या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केल्याचे तलाठी ए. एस. महाडिक यांनी सांगितले.'वनविभागाची जमीन याच उत्खनन होत असलेल्या जमिनीला लागून वरील बाजूने आहे. यामुळे वनविभागाची जमीनही धोक्यात आली आहे. वनविभागानेङई तक्रारीची दखल घेत पाहणी केली आणि हे काम थांबवले असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यावेळी उत्खनन करण्यास सुरुवात केली त्यावेळी वनविभागाला सांगणे अपेक्षित होते. मात्र, वनविभागाला न कळवताच काम सुरू केल्याने वनविभागाची जमीन अडचणीत आली आहे. हे उत्खनन करताना संबंधित ठेकेदाराने जेसीबी आणि ट्रॅक्टर इत्यादी यांत्रिक साधनांचा वापर केला आहे.  या उत्खननामुळे किल्ले रायगडचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी उत्खनन केले आहे त्या ठिकाणी अतिउच्च दाबाच्या तारांचा टाॅवर उभा आहे. शेजारील माती खणून काढल्याने या टाॅवरलाही धोका निर्माण झाला आहे.किल्ले रायगड परिसरात नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. ज्या भागात उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी वनविभागाची जागा आहे, अथवा नाही याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच कार्यवाही केली जाईल.- प्रशांत शिंदे, वन अधिकारी, महाड रायगड किल्ल्याजवळ उत्खनन करण्यासाठी एक अर्ज महाड तहसील कार्यालयात दिला आहे. मात्र, किल्ल्याचा परिसर हा संवेदनशील असल्याने आणि उत्खनन करण्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ठरवले जाईल.– सुरेश काशीद, तहसीलदार, महाड 

टॅग्स :Raigadरायगड