शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये रोज एक लाख लिटर पाण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 02:01 IST

महाड शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाण्याचा साठा पूर्णपणे संपुष्टात आल्यामुळे शहरवासीयांना अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून

महाड : महाड शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाण्याचा साठा पूर्णपणे संपुष्टात आल्यामुळे शहरवासीयांना अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून या टंचाईग्रस्त परिसरात नगरपरिषद प्रशासनातर्फे टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आरओ वॉटरला अर्थात प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या जार्सला शहरात वाढती मागणी असल्याचे दिसून येत आहे. सध्या दररोज एक लाख लिटर्सहून अधिक पाण्याची विक्री या आरओ वॉटर ट्रिटमेंट प्लांट चालकांकडून केली जात आहे.रिवर्स अ‍ॅक्वासिफ अल्ट्राव्हायलेट कार्बन आणि सँड फिल्टर केलेले पाणी शुद्ध असल्याचा दावा या जलशुद्धीकरण प्रक्रिया करणाऱ्या युनिट चालकांकडून केला जात आहे. औद्योगिक क्षेत्र परिसरात आसनपोई गावात दोन तर तालुक्यात अन्य दोन ठिकाणी असे चार युनिट सध्या कार्यरत आहेत. माणगावमधूनही आरओ वॉटर मागविले जात आहे. तीस ते चाळीस रुपयांना वीस लिटरचे जार्स उपलब्ध असून या पाण्याची घरपोच सेवा केली जात आहे. मात्र महाड शहरात पाऊस पडेपर्यंत या पाण्याला वाढती मागणी लक्षात आल्याने त्या संधीचा फायदा हे युनिट चालक घेत आहेत. ३० ते ६० रु. ला विकले जाणारे हे आरओ वॉटरचे जार्स सध्या पन्नास रुपयांना विकले जात असल्याचे दिसून येत आहे. नाईलाजास्तव हे शुद्ध पाण्याचे जार्स विकत घेण्यावर नागरिकांचा भर असल्याचे दिसून येत आहे. मात्र दररोज हे विकतचे पाणी घेणे परवडणारे नसल्याने सामान्य नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. (वार्ताहर)पाणीटंचाईपासून सुटका होण्यासाठी शहरवासीयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सक्षम आहे. शहरात सध्या चार खासगी टँकरद्वारे तसेच एक नगरपरिषदेच्या अग्निशमनद्वारे टंचाई निर्माण झालेल्या भागात पाण्याचा पुरवठा केला जात असून गरज भासल्यास आणखी टँकर वाढवण्यात येतील.- महमदअली पल्लवकर, नगराध्यक्ष, महाड