शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त असूनही पीओपी नको, शाडूची मूर्ती हवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:40 IST

गणेशोत्सव जवळ आला असून, कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे.

- निखिल म्हात्रे

अलिबाग : शासनाने पीओपी मूर्तींवर अद्याप बंदी घातली नसली तरी गेली काही वर्षे गणेशभक्तांचा कल पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे वाढत आहे. परिणामी महाग असूनही शाडूच्या मूर्तींना मागणी वाढत आहे. कारखानदारांच्या मते यंदा ३० टक्के शाडूच्या मूर्तींना मागणी आहे. 

गणेशोत्सव जवळ आला असून, कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. कच्च्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून, रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशभक्तांची पावले आता मूर्ती कारखान्यांकडे वळत असून, ते नोंदणी करत आहेत.  आपल्याला हव्या असलेल्या गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी भक्त करत असल्याचे चित्र दिसून येते.

जिल्ह्यातील गणेशभक्तांमध्येही  पर्यावरणविषयक जागृती होत असल्याचे आश्वासक चित्र आहे. काही गणेशभक्त कारखान्यांमध्ये आपल्याला शाडूच्या मातीपासूनच बनविलेली गणेशमूर्ती हवी, अशी मागणी करत आहेत. यामुळे कारखानदारांनाही शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवाव्या लागत आहेत. यावर्षी जिल्ह्यात जवळपास ३० टक्के नागरिकांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची मागणी केली आहे.

 पीओपीची मूर्ती स्वस्त का?     वजनाने हलके व शाडूच्या मातीपेक्षा पीओपी स्वस्त आहे. तसेच शाडूच्या मातीपासून गणपतीची कच्ची मूर्ती बनविण्यासाठी तसेच मूर्तीचे कोरीवकाम करण्यासाठी एका कारागिराला दोन दिवस जातात.    तर पीओपीपासून एका दिवसात एक कारागीर दोन मूर्ती तयार करतो. पीओपीची मूर्ती सुकविणे शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा सोपे जाते. पीओपीच्या मूर्तीची आखणी करणेही शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा सोपे आहे. 

शाडूच्या मातीच्या मूर्ती महाग असल्याने गणेशभक्तही मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती खरेदी करतात. मात्र, काही गणेशभक्त आता शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींची मागणी करत असून, ती वाढली आहे. त्यांच्यासाठी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या जात आहेत.    - नितीन पेडणेकर, मूर्तिकार

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव