शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लाईट गेले तरी महावितरणचे अधिकारी करतात चालढकल; नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 06:38 IST

अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे  सांगितले

पनवेल - महावितरणचे अधिकारी वीजपुरवठा खंडित झाल्यावर कशा प्रकारे चालढकल करतात. याबाबतच्या तक्रारींचा पाढाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी(दि. ८) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलावलेल्या बैठकीत नागरिकांनी वाचला.या दृष्टीने महिन्याच्या पहिल्या सोमवारी महावितरणतर्फे लोकशाही दिन साजरा करण्यात येणार असून, त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याची  योग्य  प्रकारे अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश  आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सतीश सरोदे व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल मनपा माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होते. 

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढीव देयके, मीटर बदलताना घेतले जाणारे पैसे, कर्मचाऱ्यांची उद्धट उत्तरे, वीज गेल्यानंतर फोन न उचलणे अशा विविध समस्यांच्या अनुषंगाने बैठकीत अनेकांनी तक्रारी केल्या. महावितरणच्या कार्यालयात सीसी टीव्ही बसवा म्हणजे कोण खोटे बोलते ते समजेल असेही सुचविण्यात आले. 

लोकांनी किती वाट पाहायची?अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे  सांगितले; पण टोल फ्री नंबरवर अनेक वेळा व्यस्त असतो. तुम्ही लाईनवर आहात, अशी टेप वाजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांनी किती वेळ वाट पाहायची ते सांगा. त्यासाठी काही तरी उपाययोजना करण्यास सुचविले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण