शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पेड न्यूजच्या तक्रारींसाठी समितीची स्थापना

By admin | Updated: February 1, 2017 00:47 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता उमेदवारांनी करावयाच्या खर्चावर राज्य निवडणूक आयोगाने निर्बंध घातलेले असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने

अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता उमेदवारांनी करावयाच्या खर्चावर राज्य निवडणूक आयोगाने निर्बंध घातलेले असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास अशा उमेदवारास अपात्र ठरविण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहेत.‘पेड न्यूज’ या सदराखाली मोडणाऱ्या जाहिराती, बातम्या यावर होणारा खर्च कुठेही दर्शविला जात नाही आणि त्यामुळे हा खर्च निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट होत नाही. पेड न्यूजसंदर्भात येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हानिहाय समितीचे गठन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या छापील प्रसार माध्यमांवर देण्यात आलेल्या पेड न्यूजच्या संदर्भात आलेल्या तक्र ारींवर चौकशी करून निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीचे, रायगड अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ संबंधित मतदार विभाग/निर्वाचक गणाचे तहसीलदार हे सदस्य आहेत. तर जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर हे समितीचे सदस्य सचिव आहेत. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केल्यावर ही समिती एक वार्ताहर परिषद घेऊन तसेच वृत्तपत्रामध्ये जाहीर सूचना देऊन निवडणुकांमध्ये होणाऱ्या पेड न्यूज म्हणजे काय याची माहिती सर्व संबंधितांना देईल. अशाप्रकारे पेड न्यूजबाबत आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याकरिता जाहिरात समितीचे गठन केलेले आहे हे सर्वांच्या निदर्शनास आणेल. ही समिती संबंधित जिल्ह्यात प्रसिध्द होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज यामध्ये मोडणाऱ्या बातम्या निवडणुकीच्या कालावधीत प्रसिध्द होत आहेत यासंदर्भात तक्रार आल्यास त्या पेड न्यूज सदराखाली मोडतात किंवा कसे याची निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत छाननी करेल. एखादी बातमी पेड न्यूज आहे असे समितीचे मत झाल्यास या पेड न्यूजवरील खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवेल. समिती घेणार अंतिम निर्णयएखादी राजकीय जाहिरात, उमेदवाराची बातमी पेड न्यूजच्या स्वरु पात असल्याचे समितीचे मत झाल्यास या बातमी, जाहिरातीवर झालेला खर्च उमेदवारांच्या खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये अशी नोटीस संबंधित पक्ष, उमेदवार यांना देईल.समितीकडे पक्ष, उमेदवार तसेच प्रसार माध्यम यांनी आपली बाजू लेखी स्वरु पात मांडल्यानंतर समिती यासंदर्भात अंतिम निर्णय घेईल.एखादी बातमी पेड न्यूज आहे असे समितीचे मत झाल्यास या पेड न्यूजवर झालेला खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्याबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवेल. तक्र ार आल्यास त्या बातम्या पेड न्यूज सदराखाली मोडतात किंवा कसे याची निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत समिती छाननी करेल.