शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक फटाक्यांची ‘एंट्री’; धुराची मर्यादा केलेले फटाके बाजारात उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 19:17 IST

पर्यावरणपूरक फटाके जरी बाजारात दाखल झाले असले तरी यंदा फटाक्यांची खरेदी रायगडकरांचा खिसा रिकामा करणार आहे.

अलिबाग : प्रदूषणामुळे फटाक्यांची विक्री घटत असतानाच हा व्यवसाय टिकविण्यासाठी यंदा ‘ग्रीन फायरवर्क’चे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. धूर कमी करणारी फुलबाजी, ‘फॅन्सी’ फटाके, भुईनुळे, भुईचक्र बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून, त्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक फटाके जरी बाजारात दाखल झाले असले तरी यंदा फटाक्यांची खरेदी रायगडकरांचा खिसा रिकामा करणार आहे.

फटाक्यांच्या दरांमध्ये १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर दिवाळी जोरदार साजरी होणार असल्याने शहरात फटाक्यांच्या स्टॉलची संख्याही यंदा वाढली आहे. जिल्ह्यातील परिसरात फटाक्यांचे अनेक स्टॉल्स लागले आहेत. रिटेल आणि होलसेल दरामध्ये फटाके विक्री केली जात आहे. दिवाळी सुरू होण्यासाठी आता १२ दिवसच उरले असल्याने पुढील काही दिवसांमध्ये या गर्दीमध्ये आणखी वाढ होईल, असे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. 

फटाक्यांच्या दरांचा अंदाज घेतला असता नेहमी २५० रुपयांना मिळणारा सुतळी बॉम्बचा बॉक्स तीनशे रुपयांवर जाऊन पोहोचला आहे, तर फुलबाजी, भुईनुळे, भुईचक्र, बाण, लवंगी, लक्ष्मी बॉम्ब, आकाशात उंच उडणारे ‘फॅन्सी’ फटाके यांच्याही किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. या फटाक्यांमध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांना अधिक मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या या फटाक्यांच्या प्रकारांचे उत्पादन यंदा ८० ते ९० टक्क्यांनी वाढले असून, नागरिकांकडूनही या फटाक्यांची मागणी केली जात आहे.

‘आपटी बार’ जोरात चालणारकाही वर्षांपूर्वी छोट्याशा पुडीसारखे दिसणाऱ्या आणि पायात चटकन वाजणाऱ्या आपटी बारवर काही वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता उठवण्यात आली असून, आपटी बार खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. याशिवाय सुट्या लवंगीची विक्रीही चांगली होत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.

फटाक्यांच्या किमती कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे यंदा नागरिकांनाही काहीशा वरच्या दरामध्ये फटाके घ्यावे लागतील. दोन वर्षांनंतर फटाक्यांच्या बाजाराने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आता नागरिक चांगली खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे.- प्रतीक शिंदे, फटाका व्यावसायिक

टॅग्स :alibaugअलिबाग