शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांचे काम बंद, जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:03 IST

महसूल विभाग आणि पुरवठा विभाग हे दोन्ही भिन्न आहेत. या विभागाचे दोन स्वतंत्र मंत्री, दोन स्वतंत्र सचिव आहेत, परंतु पुरवठा विभागात महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने काम करतात

अलिबाग : महसूल विभाग आणि पुरवठा विभाग हे दोन्ही भिन्न आहेत. या विभागाचे दोन स्वतंत्र मंत्री, दोन स्वतंत्र सचिव आहेत, परंतु पुरवठा विभागात महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने काम करतात. त्यामुळे पुरवठा विभागाने आता आपल्याच विभागात स्वतंत्र कर्मचा-यांची भरती करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे पुरवठा विभागात काम करणाºया महसूल कर्मचा-यांना महसूल विभागात समाविष्ट करणे हा पर्याय आहे, मात्र महसूल विभागात एवढा कर्मचाºयांचे पुनर्वसन कसे होणार याची भीती त्यांना सतावत आहे. या विरोधात त्यांनी मंगळवारी जिल्ह्यामध्ये एक दिवसाचे काम बंद आंदोलन छेडले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुरवठा विभागात सुरुवातीपासूनच कारकून स्तरावरची भरती झाली नाही. त्यामुळे त्या विभागात महसूलच्या कर्मचाºयांचा भरणा केला गेला. ही बाब आता मंत्रालयीन स्तरावर पुन्हा एकदा जाणवू लागली आहे. त्यानुसार पुरवठा विभागाने पुरवठा विभागात स्वतंत्र भरती प्रक्रिया करण्याला सुरुवात केली आहे. याची सुरुवात विदर्भापासून आधीच झाली आहे. ते लोण आता विविध कोकण विभागात शिरकाव करण्याच्या स्थितीमध्ये आहे. याचा निषेध म्हणून रायगडच्या जिल्हा पुरवठा विभागाने कामबंद आंदोलन केले. त्यामध्ये १५ तालुक्यातील पुरवठा विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला.जिल्हा पुरवठा विभागात जिल्हा पुरवठा अधिकारी यांची एक जागा मंजूर आहे, ती जागा भरलेली आहे. नायब तहसीलदार आणि तहसीलदार वर्गाच्या प्रत्येकी एक-एक जागा मंजूर असल्या तरी त्या दोन्ही जागा रिक्त आहेत. अव्वल कारकूनच्या ५८ मंजूर जागांपैकी पाच पदे रिक्त, लिपिकच्या ५२ पैकी सात जागा रिक्त आहेत. पुरवठा निरीक्षकाच्या आठ जागांपैकी तीन रिक्त आहेत. पुरवठा विभागाने आधी रिक्त असणाºया जागा भरण्याबाबत विचार सुरु केला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर दुफारे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड