शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीईओकडून कामगारांना शिवीगाळ, डीपी वर्ल्डमधील प्रकार : न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:18 IST

दिवाळी सणासाठी देण्यात येणाºया सानुग्रह अनुदानाची रक्कम ३० हजारांपर्यंत वाढविण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांनी असभ्य भाषेत शिवीगाळ करून दालनातून हुसकावून

उरण : दिवाळी सणासाठी देण्यात येणाºया सानुग्रह अनुदानाची रक्कम ३० हजारांपर्यंत वाढविण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांनी असभ्य भाषेत शिवीगाळ करून दालनातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एनएसआयसीटी कामगार संघटनेच्या कामगारांनी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे संतप्त कामगार आणि मुजोर प्रशासन यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.जेएनपीटीअंतर्गत एक बंदर एनएसआयसीटी या खासगी बहुराष्टÑीय कंपनीला दिले आहे. त्यानंतर हेच बंदर एनएसआयसीटीने डीपी वर्ल्ड म्हणजे दुबई पोर्टला चालविण्यास दिले आहे. या दुबई पोर्टमधून वर्षाकाठी सुमारे १३ लाख कंटेनरची हाताळणी केली जाते. या खासगी बंदराला जोडून अतिरिक्त ३३० मीटर लांबीची जेट्टी उभारण्यात आली असून, दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या नव्या एक्स्टेंशन बंदरातूनही वर्षाकाठी साडेचार ते पाच लाख कंटेनर हाताळणी केली जात आहे.प्रचंड नफ्यात असलेल्या या दुबई पोर्ट (डीपी वर्ल्ड) बंदरात सध्या २८२ कामगार काम करीत आहेत. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कामगारांना कंपनीकडून देण्यात येणाºया सानुग्रह अनुदान रकमेकडे लक्ष लागून राहिले आहे. दरवर्षी कामगारांना १७ हजार ६०० रुपयांना अनुदान दिले जात होते. यावर्षी सानुग्रह अनुदानाची रक्कम ३० हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी कामगारांनी केली आहे. मात्र, बंदराची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून देण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे. दिवाळी बोनसची आणि वाढीव सानुग्रहाच्या रकमेच्या प्रतीक्षेत असलेले काही कामगार चौकशी करण्यासाठी मंगळवारी (१० आॅक्टोबर) दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांच्या दालनात गेले होते.सीईओच्या दालनात चौकशी करण्यास गेलेल्या कामगारांना बोनस, वाढीव अनुदानाच्या रकमेऐवजी सीईओ रविंदरसिंग जोहल यांच्या अश्लील शिवीगाळ आणि अपशब्दांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याची पाळी आली. इतक्यावर न थांबता त्यांनी दालनातून कामगारांना हाकलून देण्याचाही प्रयत्न केला. आम्ही बोनस आणि वाढीव सानुग्रह अनुदानाच्या चौकशीसाठी आलो असून आमच्या प्रतिनिधींशी चर्चा का करीत नाही? कामगारांना समर्पक कारणे का देत नाही, अशी विचारणाही कामगारांनी सीईओकडे केली. मात्र, सीईओ जोहल यांनी कामगारांना शिवीगाळ करून उर्मट भाषेत निरुत्तर करीत कामगारांच्या जखमेवर एक प्रकारे मीठच चोळल्याची संतप्त भावना कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांच्याविरोधात न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी लेखी तक्रारही दाखल केलीआहे.यासंदर्भात कंपनीशी संपर्क साधला असता कामगारांशी झालेल्या वादाबद्दल सीईओने कामगारांसमक्ष दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कामगार आणि प्रशासनातील वाद संपुष्टात आला आहे. दरवर्षी देण्यात येणाºया ८.३३ टक्के बोनस कामगारांच्या खात्यावर जमा होणार असून, वाढीव सानुग्रह अनुदानाच्या रकमेबाबतही येत्या सोमवारपर्यंत निर्णय होईल, अशी माहिती दुबई पोर्टचे एचआरओ संजीवन कोकणे यांनी दिलीआहे.कामगारांना दिवाळीसाठी देण्यात येणाºया बोनस, वाढीव सानुग्रह अनुदानाच्या रकमेऐवजी सीईओकडून शिव्याची लाखोली आणि अपशब्दाचा मार मिळाल्याने कामगारवर्गात सध्या संतापाचे वातावरण पसरले आहे. यामुळे दिवाळी सणापूर्वीच कामगार आणि प्रशासन यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केलीआहे.