शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, शिक्षक, कर्मचा-यांच्या कामबंदचा दहावा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:03 IST

चांदई आणि डिकसळ येथे असलेल्या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

कर्जत : तालुक्यातील चांदई आणि डिकसळ येथे असलेल्या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ८० टक्के कामगारांनी सुरू केलेले कामबंद आणि असहकार आंदोलन दहाव्या दिवशी देखील सुरूच आहे.थकीत पगार सरस्वती एज्युकेशन ट्रस्टने देण्याच्या मागणीसाठी चांदई येथील तासगावकर महाविद्यालयाच्या कामगार वर्गाने ५ मार्चपासून असहकार आंदोलन पुकारले. संस्थेच्या सात महाविद्यालयातील ८०० हून अधिक कर्मचाºयांनी कामबंद आंदोलनात सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखविली होती. तासगावकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी व्यवस्थापन कामगार कोर्टात गेले आणि तेथे कामबंद आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र न्यायालयाने कामगारांची बाजू ऐकून घेताना कोणताही निर्णय दिला नाही, कामगार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कर्जत पोलिसांच्या १०० मीटर हद्दीच्या मर्यादेनंतर १३ मार्च रोजी कामगारांनी आंदोलन महाविद्यालयाबाहेर सुरू ठेवले. कामगार कोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी दुपारी सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी कामगारांनी आंदोलन पुकारत आहेत, तेथे येऊन मार्च अखेरपर्यंत कामगारांचे सर्व थकीत पगार देण्याची तयारी दाखवली. मात्र यापूर्वीचे दोन्ही अनुभव लक्षात घेऊन कामगारांनी संस्थेच्या मार्चपर्यंत सर्व पगार देण्याच्या आश्वासनावर आक्षेप घेतला.संस्थेमध्ये ८०० हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करीत असून कामगार कायद्यानुसार अनेक समस्यांना कामगारांना सामोरे जावे लागत आहे. त्यात शिक्षक वर्गाचे मागील १८-१९ महिन्यांचे पगार थकले आहेत, तर कर्मचारी वर्गाचे ८-१० महिन्यांचे पगार थकले आहेत.२०१३ नंतर संस्थेकडून कामगारांच्या पीएफची रक्कम भरली गेली नाही. कामगार कायद्यानुसार कामगारांचे कर कपातीसाठी आवश्यक असलेला फॉर्म १६ संस्थेकडून भरण्यात आला नाही.या मागण्यांसाठी सरस्वती एज्युकेशन ट्रस्टच्या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरूच राहील असा निर्धार केला.ंआम्ही शनिवारी कामगार कोर्टात हजर झालो, मात्र कामगारांच्या हाती काही मिळत नसल्याने सर्व कामगारांना विश्वासात घेऊन आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही. आमच्या अन्य मागण्यांप्रमाणे पूर्ण वेतन मिळावे अशी प्रमुख मागणी आहे. संस्था आम्हाला १४० टक्के वेतन देण्याऐवजी ४०-७० टक्के वेतन देऊन आमचे आर्थिक नुकसान करीत आहे.-अविनाश भासे, कामगार प्रतिनिधी

टॅग्स :Teacherशिक्षक