शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

जनतेच्या मदतीने कोरोनाचे निर्मूलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:28 IST

आदिती तटकरे : श्रीवर्धनमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात केली आहे. जनतेच्या सहकार्यातून कोरोना विषाणूचा समर्थपणे सामना करत, त्याचे निर्मूलन करण्याचे आपले ध्येय असल्याचे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. 

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेत शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला, कोरोना निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती, नगरपरिषद, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून विविध गटांची निर्मिती करून सर्वत्र सर्वेक्षण करणार आहोत. घरात आजारी असलेल्या प्रत्येक व्यक्ती, त्याच सोबत त्या व्यक्तीच्या आजाराविषयी योग्य ती माहिती त्याच्याकडून संकलित करून, त्या व्यक्तीस आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन करून, त्यास तत्काळ वैद्यकीय सेवा आपण उपलब्ध करून देणार आहोत. कोरोनाचे लक्षण असणारे व्यक्ती, कोरोनाबाधित मात्र लक्षणे नसणारी व्यक्ती या सर्वांना योग्य वेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सुरुवात केलीे.   

आजाराने बाधित झाल्याने अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. हा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सदरची मोहीम अतिशय महत्त्वाचे आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. प्रशासनाने निर्माण केलेली टीम एका दिवसात किमान ५० व्यक्तींची चाचणी दिवसभरात करणार आहे. त्यानुसार, सर्व नियोजन करण्यात आले आहे. शिक्षक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, नगरपालिका कर्मचारी या सर्वांची या मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. जनतेने या सर्व घटकांना सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी  असे आवाहन तटकरे यांनी केले. दरम्यान, तटकरे यांनी भोस्ते, श्रीवर्धन शहरातील कसबा, मोहल्ला या भागात फिरून गृहभेट देत व्यक्तींचे तापमान मोजणे, त्यांच्या हाताला सॅनिटायझर लावणे, मास्क लावण्याविषयी सूचना केल्या.  श्रीवर्धन नगरपरिषदेचे प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी उपस्थित होते. आज श्रीवर्धन शहरातील विविध भागांतील घरांमध्ये जाऊन लोकांना कोरोनाविषयी सजग केले आहे. गृह भेटीदरम्यान संबंधित घरांतील व्यक्तींचे कोरोनाविषयीची लक्षणे, विचार, त्यांची कृतिशीलता या सर्व बाबी जाणून घेतल्या आहेत. माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेणे, त्याचे निराकरण करणे हे माझे दायित्व आहे.      -आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड