शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:12 IST

निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे प्रथमच २४२ सरपंच आता थेट जनतेमधून निवडले जाणार आहेत. १६ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधीच राजकीय धमाका अनुभवायला मिळणार आहे.रायगड जिल्ह्यातील २५३ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. पैकी २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने जाहीर केला. सप्टेंबर आणि आॅक्टोबर या कालावधीत निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे.जिल्ह्यासह तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तेथील संपूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे.निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये देखील आचारसंहिता राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे.थेट नगराध्यक्ष निवडीनंतर प्रथमच आता जनतेमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे राजकीय डावपेचांना जिल्ह्यात चांगलाच जोर येणार असल्याचे बोलले जाते. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असला तरी राजकीय पक्षांना त्यांच्या राजकीय चिन्हाचा वापर करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.नवरात्रोत्सवाच्या कालावधीत आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यामध्ये शेकापसह राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलेच वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. काँग्रेसला अद्यापही राजकीय दिशा सापडलेली नसल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत त्यांचे कसब पणाला लागणार असल्याचे बोलले जाते.भाजपासाठी ही निवडणूक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणावी लागेल. ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागतील.जनतेमधून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने विविध राजकीय पक्षांना आतापासूनच आपल्या व्यूहरचनेत बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत राजकीय वातावरण तापून राजकीय धुळवड अनुभवायला मिळणारआहे.