शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक होणार रंगतदार

By admin | Updated: December 21, 2015 01:30 IST

नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागातून ६४ उमेदवारांनी अर्ज दाखले. मात्र छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ५३ उमेदवार रिंगणात आहेत

प्रकाश कदम,  पोलादपूरनगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागातून ६४ उमेदवारांनी अर्ज दाखले. मात्र छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ५३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील प्रभाग क्र. ६ मध्ये शेकापचे उमेदवार राम काशिराम सुतार यांचा अर्ज अवैध ठरल्याने शिवसेनेचे उमेदवार व पोलादपूर ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच उमेश पवार यांचा एकमेव अर्ज प्रभाग क्र. ६ मध्ये राहिल्याने पोलादपूर नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आल्याची औपचारिक घोषणाच बाकी आहे.पोलादपूर नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून एकूण मतदार संख्या ४४६८ एवढी आहे. त्यामध्ये पुरुष मतदार २१८७ असून स्त्री मतदार संख्या २२८१ एवढी आहे. एकूण ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत तर प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान महिलेला मिळणार आहे. प्रभाग क्र. ४ हा सर्वात जास्त मतदार म्हणजे ४७७ संख्या असलेला प्रभाग असून प्रभाग क्र. १६ हा सर्वात कमी मतदार म्हणजे १४१ मतदार संख्या आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये सर्व १७ प्रभागामध्ये निवडणूक लढवणारा पक्ष म्हणून शिवसेना हा एकमेव पक्ष आहे तर एकूण १३ प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवार देऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजपा, शेकाप यांनी काही प्रभागात आपले उमेदवार दिले आहेत. शिवसेनेमध्ये काही इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्र.क्र.४, ५, १७ मधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा रस्ता धरला. त्यामुळे काहीशी बॅकफूटवर आलेल्या शिवसेनेला प्र.क्र.६ मधील उमेश पवार यांच्या बिनविरोध निवडीमुळे नवसंजीवनी प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीसाठी काँग्रेस - शेकाप या पक्षांची आघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीमध्ये सामील झाल्यास निवडणूक अजून रंगतदार होऊ शकते. सध्यातरी शिवसेना व काँग्रेस यांच्यामध्ये ही निवडणूक चुरशीची होणार असे दिसून येते.आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, माजी आमदार प्रवीण दरेकर या नगरपंचायतीच्या निवडणूक निमित्ताने आमनेसामने आले आहेत. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बाजारहाटासाठी व शासकीय कामाकरिता पोलादपूर तालुक्यातील ८७ गावे २१२ वाड्यातील ग्रामस्थ या शहरावर अवलंबून आहेत. या शहरात महिलांसाठी शौचालये असणे गरजेचे आहे तर बऱ्याच प्रभागांमध्ये अंतर्गत रस्त्यांची समस्या असून सांडपाण्याची व्यवस्था नाही. येथे मनोरंजनासाठी एकही सिनेमागृह नाही तर खेळांसाठी मैदान नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांना किंवा जनतेला निवांत बसण्यासाठी गार्डन नाही. अशा प्रकारची नागरी सुविधांची आव्हाने निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपुढे असणार आहेत.