शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:36 IST

घरभेटी सुरु : जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींकरिता रविवारी मतदान

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत असून यासाठी सुरू असलेला प्रचाराच्या तोफा शुक्र वारी सायंकाळी थंडावल्या असून आता ‘मॅन-टू-मॅन’ संपर्कास प्रारंभ झाला आहे.अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर १८७ ग्रामपंचायतींपैकी ३९ सरपंचपद तर एक हजार ६४७ पैकी ५५३ सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यपदांच्या एकूण एक हजार १४४ जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होणार असून दोन हजार ५८२ उमेदवारांची लढत होणार आहे. २७ मे रोजी मतदान होईल.अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणाऱ्या जागा १५ असून ४७ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. सदस्य पदासाठी १५३ जागा असून ३४४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढविणार आहेत. पेणमध्ये सरपंच पदासाठी सात जागा असून २३ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ६८ जागा असून १७२ उमेदवार आहेत. मुरु डमध्ये सरपंच पदासाठी १२ जागा असून ३४ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ९७ जागा असून २३९ उमेदवार आहेत. पनवेलमध्ये सरपंच पदासाठी १४ जागा असून ३३ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ११७ जागा असून २४७ उमेदवार आहेत. उरणमध्ये सरपंच पदासाठी एक जागा असून चार उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी १७ जागा असून ३६ उमेदवार आहेत.कर्जतमध्ये सरपंच पदासाठी पाच जागा असून १२ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ३६ जागा असून ७५ उमेदवार आहेत. खालापूरमध्ये सरपंच पदासाठी १७ जागा असून ४५ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी १४१ जागा असून ३00 उमेदवार आहेत. माणगावमध्ये सरपंच पदासाठी १७ जागा असून ४0 उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ८५ जागा असून १७३ उमेदवार आहेत. तळामध्ये सरपंच पदासाठी पाच जागा असून १२ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ११ जागा असून २३ उमेदवार आहेत. रोहामध्ये सरपंच पदासाठी सात जागा असून २१ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ५१ जागांसाठी ११७ उमेदवार आहेत.सुधागडमध्ये सरपंच पदासाठी दहा जागा असून २३ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ७५ जागा असून १६४ उमेदवार आहेत. महाडमध्ये सरपंच पदासाठी १३ जागा असून ४0 उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ४९ जागांसाठी १0१ उमेदवार आहेत. पोलादपूरमध्ये सरपंच पदासाठी आठ जागा असून १७ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ५३ जागा असून १0८ उमेदवार आहेत. श्रीवर्धनमध्ये सरपंच पदासाठी पाच जागा असून १२ उमेदवार आहेत.उमेदवारांचा घरोघर भेटीचा कार्यक्रमसदस्य पदासाठी १८ जागा असून ३७ उमेदवार आहेत. म्हसळामध्ये सरपंच पदासाठी दहा जागा असून २२ उमेदवार आहेत. तसेच सदस्य पदासाठी २७ जागांसाठी ५५ उमेदवार आहेत. १८७ पैकी ३९ सरपंचपद बिनविरोध झाले असून दोन सरपंचपद रिक्त राहिले आहेत. त्यामुळे सरपंचपदाच्या१४६ जागांसाठी निवडणूक होत असून ३९१ उमेदवार रिंगणात आहेत.एक हजार ६४७ सदस्यपदांपैकी ७६ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. ५५३ जागा बिनविरोध तर ९९८ जागांवर निवडणूक होणार असून दोन हजार १९१ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. २७ मे रोजी जिल्ह्यातील ५२६ मतदान केंद्रांवर मतदान होईल. मतमोजणी सोमवारी होणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक