अलिबाग : पेण तालुक्यातील मायनी (रानसई) गावातील रघुनाथ पवार कुटुंबास गेल्या पाच वर्षांपासून वाळीत टाकल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वाळीतग्रस्त आणि वाळीत टाकणारे गावकीचे प्रमुख यांच्या संयुक्त बैठकीत मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलीस व महसूल प्रशासनाने केला, परंतु यश आले नाही. अखेर वाळीतग्रस्त रघुनाथ दगडू पवार, लक्ष्मण दगडू पवार, संजय लक्ष्मण पवार व संदेश लक्ष्मण पवार यांच्या तक्रारीनुसार पेण पोलिसांनी गावकीचे प्रमुख पुढारी लक्ष्मण पांडुरंग पवार, विजय कोंडिबा पवार, श्रीरंग दगडू पवार, रमेश दगडू पवार, सुरेश रामचंद्र पवार, धोंडिबा दगडू पवार, देवजी जावजी पवार, संतोष भिवराम पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.‘वाळीत प्रकरण समन्वय समिती’ पेणमध्ये पेण तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. तिच्यासमोर प्रकरणाची सुनावणी होऊन मार्ग निघाला तर ठीक, अन्यथा तक्रारदारांच्या तक्रारीनुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिले होते. वाळीतग्रस्तांनी गुन्हा दाखल करण्याचीच मागणी केली होती, असे पोलीस निरीक्षक ए.ए.जगदाळे यांनी सांगितले.
वाळीत टाकल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 16, 2016 02:10 IST