शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

एसटी बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान; नेरळ-ओलमण बस पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:47 IST

कर्जत आगारातून ओलमण गावासाठी एसटी चालविण्यात येत होती. मात्र सध्या ही गाडी बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत आगारातून ओलमण गावासाठी एसटी चालविण्यात येत होती. मात्र सध्या ही गाडी बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील गावे, आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. नेरळ-ओलमण एसटी पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.कर्जतचे पहिले आमदार मनोहर पादिर यांच्या प्रयत्नाने ओलमण - नेरळ ही आदिवासी भागासाठी जीवनदायिनी ठरलेली बससेवा गेल्या ३० वर्षांपासून नियमित सुरू होती. परंतु आठ दिवसांपासून ही बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे ओलमण, कळंब, साळोख, चई या आदिवासी भागातील ओलमण, तेलंगवाडी, बोंडेशेत,पेंढरी, भोपळेवाडी, कोतवालवाडी, झुगरेवाडी, बोरीचीवाडी, भागुचीवाडी, बनाचीवाडी, पादिरवाडी, चाहुचीवाडी, मिरचुलवाडी, एकनाथवाडी, नारळाचीवाडी, तळ्याचीवाडी(भागुचीवाडी), तसेच पाठगाव पठार परिसरातील असंख्य वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. या आदिवासीवाडींतील अनेक शालेय विद्यार्थी पोशिर, नेरळ, कर्जत, बदलापूर येथे शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. याशिवाय परिसरातील नागरिक, स्थानिक व्यावसायिक, रानमेवा, भाजीवाला विक्रेते, मोलमजुरीसाठी, रोजगारासाठी नेरळ, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे परिसरात बसनेच प्रवास करतात. बससेवा बंद झाल्याने व वाहतुकीसाठी अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शिवाय परिसरातील कामगार, मोलमजुरी करणाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे.ओलमण- नेरळ बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. त्यांनी कर्जत एसटी आगाराचे प्रमुख यादव यांना याप्रकरणी निवेदन दिले असून बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.९ जुलै १९८७ रोजी ओलमणसाठी एसटी सुरू झाली होती, पूर्वी दररोज एक वस्तीची गाडी तसेच दिवसभरात गाडीच्या चार फेºया होत होत्या. खासगी गाड्यांची वाहतूक या ठिकाणी नसल्याने एसटी हाच वाहतुकीचा पर्याय आहे. त्यामुळे ही बससेवा पुन्हा सुरू व्हावी.- दादा पादिर, माजी सरपंच

टॅग्स :Karjatकर्जत