शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

पनवेलमध्ये गोदामावर छापा टाकून खाद्यतेल जप्त

By admin | Updated: October 1, 2016 22:50 IST

ग्राहकांची फसवणूक करुन विक्री करीता सज्ज असलेल्या तब्बल 94 लाख 66 हजार 145 रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा पनवेलमध्ये जप्त करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत 
जयंत धुळप, दि. १ -  मधुमेह, कोलेस्टोरॉल,:हदय विकार, कॅन्सर आणि त्वचारोग यांना प्रतिबंध करण्यात अत्यंत प्रभावी अशी  ग्राहकांची दिशाभूल करणारी माहिती खाद्यतेलाच्या पॅकेट्स वर छापून त्या तेलाचा पुरवठा करुन ग्राहकांची फसवणूक करुन विक्री करीता सज्ज असलेल्या तब्बल 94 लाख 66 हजार 145 रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा पनवेल तालुक्यांतील आदिवली गावांतील मे.अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या गोदामावर धाडसी छापा घालून  अन्न  व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने गुरुवारी जप्त केला आहे. 
अन्न  व औषध प्रशासनाचे ठाणे येथील सह आयूक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली रायगड अन्न  व औषध प्रशासनाचे  सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांच्या नेतृत्वाखालील अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे व सुप्रिया जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मे.अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या गोदामातुन ग्राहकांची दिशाभुल करणारी जाहिरात करून खादय़तेलाचा पुरवठा होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर, त्याची खातरजमा करुन हा छापा टाकण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त दिलिप संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले. 
 
दिशाभूल करणारा मजकूर, नऊ नमूने रासायनिक विश्लेषणास रवाना, रितसर कारवाई करणार
अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या या गोदामाची तपासणी केली असता येथे ‘फाॅर्चून राईस ब्रान ऑईल फाॅर्चून ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल ऑईल- व्हिव्हो’ या तेलाचा साठा विक्रिसाठी ठेवल्याचे आढळले. या खादय़तेलाच्या पॅकेटवर ग्राहकांची  दिशाभुल करणारा मजकुर नमुद केला असल्याचे दिसुन आल्य़ाचे संगत यांनी सांगीतले. ‘कंट्रोलिंग डायबेटीस, कंट्रोलिंग मेटॅबॉलिक डिसऑर्डर कोलेस्टेरॉल लोवरींग ऑल, हार्ट फ्रेंडली, क्लिनर व्लड व्हेसल्स, ईम्प्रूव्हज स्किन टोन, प्रोटेकश्न अगेन्स्ट डिसिजेस’ असा मजूर या  पॉकेटवर छापलेला निष्पन्न झाला. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या अंतर्गत नियमाचे उल्लंघन करणारा हा मजकुर पॅकेटवर तसेच त्यासोबत असलेल्या पत्रकावर नमुद असल्याने ‘फाॅर्चून राईस ब्रान ऑईल फॉच्यरून ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल ऑईल- व्हिव्हो’ या खादय़तेलाचे 9 नमुने रासायनीक विश्लेषणाकरीता घेण्यात आले असल्याचे संगत यांनी पूढे सांगीतले. या प्रकरणी संबंधीत उत्पादकास नोटीस पाठविण्यात आली असुन उत्पादकाचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या अंतर्गत नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
 
उत्पादक आणि ग्राहकांना आवाहन
अन्न पदार्थाच्या पॉकेटवर अथवा जाहिरातीवर कायदयाचे उल्लंघन होईल असा कोणताही मजकुर किंवा ग्राहकांची दिशाभुल करणारा मजकुर नमुद करू नये अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या अंतर्गत नियमनुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन रायगड जिल्हयातील सर्व उत्पादकांना  सहाय्यक आयुक्त दिलिप संगत यांनी  केले आहे.   अन्न पदार्थाबाबत कोणतीही तक्रार अथवा संशय असल्यास रायगड जिल्ह्यातील ग्राहकांनी  रायगड अन्न  व औषध प्रशासनाच्या क्र.02143-252085 या दूरध्वनीवर वा टोल फ्रि क्र. 1800222365 यावर संपर्क साधावा,असे आवाहन संगत यांनी केले आहे.