शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यूच्या चिमणीतून उठले धुळींचे लाेळ, धुराच्या वासाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 17:07 IST

पेणसह अलिबाग तालुक्याच्या काही परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले हाेते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

रायगड - पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या चिमणीमधून धुळमिश्रीत धुरांचे लाेळ बाहेर पडले. लाल रंगांच्या या धुराचा वास अतिशय असह्य करणारा हाेता. त्यामुळे पेणसह अलिबाग तालुक्याच्या काही परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले हाेते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.काेराेनाच्या पार्श्वभूमीवर आधीच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीबाबत उलट-सुलट चर्चेचे रान उठले आहे. त्यातच कंपनीच्या चिमणीमधून अचानक लाल रंगाच्या धुराचे लाेळ उठल्याने परिसरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले. सदरची घटना सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे पेण आणि अलिबाग तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु असल्याने रस्त्यावर, तसेच बाजार पेठांमध्ये गर्दी हाेती. त्याचप्रमाणे कंपनी परिसराच्या बाजूला माेठ्या संख्येने नागरी वस्ती देखील आहे. कंपनीच्या चिमणीमधून अचानक धुळीचे लाेळ पसरल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले. सदरच्या धुळ मिश्रीत धुरामुळे डाेळे चुरचुरत असल्याने कंपनीमधून विषारी वायू पसरला तर नाही ना अशी शंका नागरिकांमध्ये हाेती. सुमारे 20 मिनिटे चिमणीतून धुरांचे लाेळ आकाशाकडे झेपावत हाेते. त्यामुळे परिसरामध्ये काळाेख पसरला हाेता. आपल्या आजूबाजूला काेण आहे की नाही हेसुद्धा कळत नव्हते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले हाेते.दाट पसरलेल्या धुरामुळे समोरचे दिसेनासे झाले होते. लालसर रंगाचा प्रचंड धूर आणि त्याच्या उग्र वासामुळे डोलवी, गडब, काराव, वडखळ, आमटेम, नवेगाव, वाशीसह परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना असह्य झाले होते. मात्र नेमके काय झाले? याबाबत काहीही माहिती नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचे घबराटीचे वातावरण हाेते. दरम्यान, जेएसडब्ल्यू कंपनीतील प्लांट शटडाऊन झाल्याने धुळीचे लोळ उठले हाेते. हा विषारी वायू नसल्याचे पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी स्पष्ट करुन आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले.नारायण बाेलबुंडा (जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू)--------------------------कंपनीमध्ये काेणतीही दुर्घटना घडलेली नाही.सकाळी साडे अकराच्या सुमारास कंपनीच्या कोक ओव्हन प्लांटमध्ये इलेक्ट्रीक पाॅवर ट्रिप झाली. त्यामुळे काेक बनवण्याची प्रक्रीया बंद पडली आणि शटडाऊन हाेऊन मोठ्या प्रमाणात चिमणीमधून धुळीचे लाेळ बाहेर पडले. वातावरणात पसरलेला हा धुर विषारी नाही. प्लांट पूर्वत सुरु करण्यात आला आहे.