शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महामार्गावर खड्डयांसह धुळीचे विघ्न

By admin | Updated: August 18, 2016 04:41 IST

महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरु न प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी चांगलीच

धाटाव : महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरु न प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकांना रस्ता शोधताना मात्र कसरत करावी लागत आहे. तर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यावर आता धुळीने दहशत पसरविल्याने वाहनचालकांना खड्डयांसह धुळीचा सामना करावा लागत आहे. कोकणात गणेशोत्सव सणाला मोठे महत्त्व आहे. किमान १५ दिवस अगोदर गणरायाच्या आगमनासाठी मुंबई, गुजरातसह इतर ठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास असणारे चाकरमानी गावाकडे धाव घेतात. तर पेण, वडखळ येथील मोठमोठया गणेशमूर्ती नेत असताना रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्डयांचा त्रास मात्र गणरायालाही सोसावा लागत आहे. त्यातच मोठ्या उत्साहात गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास मात्र कंटाळवाणा होत आहे. मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाला आता मरगळ आल्याने रस्त्यावर जागोजागी पडलेले साहित्य लगतच्या गावातील दुचाकीस्वारांना रहदारीला अडथळा ठरत आहे. काही ठिकाणी सुरिक्षततेबाबत उपाययोजनेची कमतरता असल्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. तर अवघ्या ४ ते ५ दिवसांपूर्वी पुगावनजिक रस्त्यावर पेव्हर ब्लॉक अस्ताव्यस्त पसरल्या असून नंदकुमार झोलगे यांना रात्री न दिसल्याने त्या ठिकाणी अपघात घडूनत्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाल्याची घटना घडली. तर १५ दिवसांपूर्वी एक कंटेनर रस्त्यात पलटी झाल्याने चालकाला किरकोळ दुखापत होऊन वाहतूक खोळंबली होती.सध्या धो-धो कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने चिखलमय झालेल्या रस्त्यावर आता मातीचा धुरळा निर्माण झाला आहे. महामार्गावर सुकेळी खिंडीपासून कोलाड (वरसगाव) दरम्यानच्या अंदाजे पाच किमीच्या अंतरावर अक्षरश: धुळीने थैमान घातले आहे. याचा त्रास दुचाकीस्वारांना मोठयाप्रमाणावर होत आहे. रस्त्यावरु न खड्यांबरोबर धुळीचा सामना करीत मार्गक्र मण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.तर रस्त्यावरील वाहतूक धिम्यागतीने होत असल्याने वाहनचालक तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. (वार्ताहर)