शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

मृगगडाच्या संवर्धनासाठी दुर्गवीरांचे श्रमदान, जपला जातोय ऐतिहासिक वारसा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:27 IST

१,७५० फूट उंची असणाऱ्या किल्याचे ऐतिहासीक वैभव जतन करून ठेवण्यासाठी दुर्गवीरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : गड, किल्ल्यांचा ऐतिहासीक वारसा जपण्यासाठी पूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता दुर्गप्रेमींनी राज्यभर श्रमदानातून गड संवर्धनाचे काम सुरू केले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुधागडजवळील मृगगडावरही नियमीत श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात आहे. पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढला जात आहे. सदरेवरील गवत काढून गडाची साफसफाईही केली जात आहे.रायगड जिल्ह्याला विपुल प्रमाणात दुर्गसंपत्ती लाभली असून मृगगडही त्याचाच एक भाग आहे. सुधागड तालुक्यामध्ये खोपोली ते पालीकडे जाणाºया रोडपासून डावीगडे वगळले की भेलीव गावाला लागून काथळामध्ये हा छोटासा किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली हा किल्ला असल्यामुळे घाटावरून कोकणात उरण्याच्या मार्गावर टेहळणीसाठी त्याचा उपयोग होत असावा असा अंदाज आहे. फक्त १७५० फूट उंची असणाºया किल्याचे ऐतिहासीक वैभव जतन करून ठेवण्यासाठी दुर्गवीरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.स्थानिकांच्या व दुर्गप्रेमींच्या मदतीने प्रत्येक महिन्याला श्रमदान मोहीम राबविली जात आहे. गडावर जाण्यासाठीच्या मार्गावर जंगल असून पर्यटक रस्ता चुकण्याची शक्यता आहे. यामुळे रोडवर प्रत्येक ठिकाणी गडावर जाण्याच्या मार्गाविषयी माहिती देण्यात आली आहे. गडाची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे. गडावर असलेल्या पादूका, गुहा, दगडी बांधकाम असलेले पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, बालेकिल्याचा भाग, महिषासूरमर्दीनीचे छोटे मंदिर याची माहिती देणारा नकाशा लोखंडी फलकावर लावण्यात आला असून त्यामुळे सोबत मार्गदर्शक नसतानाही गड व्यवस्थीत पाहता येतो.मृगगडाविषयी माहिती पुढीलप्रमाणे१सुधागड परिसरामध्ये भेलीव गावाजवळ मध्ययुगीन काळात किल्ल्याचे बांधकाम झाले२घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्याच्या मार्गावर सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली हा किल्ला आहे३उंबरखिंडीच्या ऐतिहासीक लढाईमध्येही टेहळणीसाठी गडाचा वापर झाला असावा असा अंदाज आहे४गडावर एक नैसर्गीकगुहा आहे५गडाच्या शिखराकडे जाण्यासाठी खडक फोडून पायºया करण्यात आल्या आहेत६गडावर दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आहेत७वाड्याचे व सदरेचे अवशेष पहावयास मिळतातश्रमदान मोहिमेत सहभागी झालेले सदस्य : मुंबई, ठाणे,रायगड परिसरातील अनेक युवक, युवती श्रमदान माहिमेमध्ये सहभागी होत आहे. नुकत्याच झालेल्या संवर्धन मोहिमेमध्ये प्रशांत डिंगणकर, अल्पेश पाटील, जयवंत कोळी, आकाश ठाकूर, आदित्य दिक्षीत, शुभम पाटील, विशाल बामणे, सुरेश उंदरे, प्रतिक पाटेकर, विठ्ठल केंबळे, निहार घोंगे, उज्वला शिखरे, प्रियंका म्हात्रे, दिव्यता घाणेकर, प्रणिता उत्तेकर, कल्पना निवाते, संस्कृती हसुरकर, विनीता पनवेलकर, किरण पाटोळे, मंगल यादव, शीतल घुगारे, गार्गी डिंगणकर, शौर्य हासूरकर, गौरी थोरात यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Raigadरायगड