शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची वीज खांबाला धडक; गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:55 IST

तालुक्यातील उमरोली येथे खरवली बाजूने येणाऱ्या चालकाचा कार (एमएच ४६ एएफ २९३१)वरील ताबा सुटल्याने ती डीपीजवळच्या वीज खांबाला धडकली, त्यामुळे वीज खांबालगतच्या केबल

माणगाव : तालुक्यातील उमरोली येथे खरवली बाजूने येणाऱ्या चालकाचा कार (एमएच ४६ एएफ २९३१)वरील ताबा सुटल्याने ती डीपीजवळच्या वीज खांबाला धडकली, त्यामुळे वीज खांबालगतच्या केबल कारच्या मागील भागात अडकल्याने पूर्णपणे तुटल्या. तिन्ही खांबाचे मोठे नुकसान झाले. जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा वीजपुरवठा सुरू होता. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरोली येथे १० च्या सुमारास कारचालक मद्यपान करून गाडी चालवत होता. त्याला उभेही राहता येत नसल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी बोलून दाखवले. अपघातात तीन वीज खांबांचे मोठे नुकसान झाले असून, दोन दिवस उलटून गेले तरी गावातील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. या प्रकरणी जोपर्यंत चालकावर कारवाई होत नाही आणि नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत वीज मंडळाकडून काम करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.उमरोली गावामध्ये साधारण ३०० ते ४०० लोकसंख्या आहे. तेथील ग्रामस्थ दोन दिवसांपासून रात्र अंधारात काढत आहेत. कारमालक व चालक ग्रामस्थांच्या भेटीला वा झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास आला नाही तर गाडीचालकाच्या मालकावर व त्या चालकावर रीतसर कारवाई करणार असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडelectricityवीज