शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शेला, धोतर, फेटा अन् दागिन्यांचा साज घेतो मनाचा ठाव; ‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती

By राजेश भोस्तेकर | Updated: July 28, 2024 11:51 IST

पेणचे गणराय हे रेखीव आखणी, आकर्षक रंगरंगोटी, शेला, धोतर, फेटा आणि दागिन्यांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.

राजेश भोस्तेकर, अलिबाग : तू सुखकर्ता तू विघ्नहर्ता, विघ्न विनाशक मोरया या उक्ती प्रमाणे गणराय हा विघ्न नाशक तसेच बुध्दीची देवता म्हणून पूजला जातो. पेण तालुका हा गणरायाच्या मूर्ती बनविण्याच्या व्यवसायात अग्रेसर आहे. नवरात्र झाली की गणेश कला केंद्रात गणरायाच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात होते.  यंदाही ती सुरू असून गणेश कला केंद्रात बाप्पांची मूर्ती आकाराला आली असून आता सजावटीची लगबग सुरू  आहे. रंगरंगोटी केल्यानंतर श्री गणेशाचे रूप दिसू लागते. पेणचे गणराय हे रेखीव आखणी, आकर्षक रंगरंगोटी, शेला, धोतर, फेटा आणि दागिन्यांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.

‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती

वेगवेगळ्या आकारातील साचे, मातीकाम, आखणी, आकार, अलंकार, डोळे करणी, हातातील आयुधे, आसन-सिंहासन, महिरप, आभूषणे, वस्त्रालंकार, अस्त्रालंकार, बालमूर्ती, सार्वजनिक मूर्ती हे पेणमधील मूर्तींचे वैशिष्ट्य आहे.

पेण शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गणेशमूर्तींचे दीड हजारांहून अधिक कारखाने आहेत. तब्बल दीड लाखांहून अधिक व्यक्ती मूर्ती व्यवसायांत विविध प्रकारे जोडल्या गेल्या आहेत.

वर्षभरातील ११ महिने मूर्तिकाम आणि शेवटच्या महिन्यात विक्री, असे व्यवसायाचे स्वरूप आहे. बहुतांश जण जोपासताहेत पिढ्यानपिढ्यांचा मूर्तिकलेचा वारसा.

मूर्तिकाम हा जीवनाचा अविभाज्य भाग. जिकडे पाहावे तिकडे आकर्षक मूर्ती आणि मातीला आकार देत मूर्ती घडविणारे दिवस-रात्र झटणारे हजारो हात.

कारागीर तासन् तास एकाच ठिकाणी बसून कोणाशीही न बोलता एकाग्रतेने काम करीत असतात. ते जीव ओतून हात चालवतात तेव्हा मातीला विशिष्ट आकार येऊन ती जिवंत होते. 

अर्थातच, त्यासाठीचा त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव, कलेशी असलेला प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे मोल कोणालाही करता आलेले नाही.

मूर्तिकला क्षेत्रात नेहमी चढ-उतार येत असतात. कधी अतिवृष्टी, कधी पीओपीवरील बंदी... अशा एक ना अनेक संकटांचा सामना पेणच्या मूर्ती कारागिरांना करावा लागतो. 

गावातच राहून वर्षाचे बाराही महिने रोजगार मिळतो.

साधारणत: १० ते २० कारागिरांच्या हातातून साकारल्या जात आकर्षक गणेश मूर्ती. प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूच्या मूर्तींना मागणी.

गणेशोत्सवाच्या दीड-दोन महिने आधीपासूनच देशांतर्गत मूर्तीचे बुकिंग. जानेवारीपासून परदेशात पाठविल्या जाणाऱ्या मूर्तींचे बुकिंग. मार्च-एप्रिलपासून जलमार्गाने सुरू होतो प्रवास.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवalibaugअलिबाग