शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे एसटीत सुरू झाल्या प्रसूतीकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 12:08 IST

Roha: एका आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे एसटीत एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या.

रोहा - एका आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे एसटीत एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला कोलाडजवळील आंबेवाडी प्राथिमक केंद्रात दाखल करीत तिथे तिची प्रसूती झाली. आईची तब्येत ठिक असली तरी बाळाचे वजन कमी असल्याने त्यांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पनवेल-महाड  एसटीत शनिवार सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. ही वार्ता जिल्हाभर पसरल्यानंतर शासन व लोक प्रतिनिधींबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

सुशीला रवी पवार ही गरोदर महिला पेण वडखळ येथून महाडकडे एसटीने (एम.एच.१४, बी.टी. २६३२) प्रवास करीत होती. ही बस सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोलाडनजीक पुई महिसदरा पुलावर आली असता, या पुलावर प्रचंड प्रमाणात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमधून गचके खात जात होती. यामुळे सुशीला पवार यांना अचानक पोटात दुखू लागले. त्यांना कळा सुरू झाल्या. ही बाब लक्षात येताच सदरील एसटीचालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान दाखवत एसटी बस ही आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. त्यांने तेथे दाखल करण्यात आले. 

 आंबेवाडी केंद्रातील डॉ. व्ही. बी. टिवडे व डॉ. एम. एस. वाघ यांनी तत्परतेने महिलेवर उपचार सुरू केले. त्यानंतर महिलेची सुखरूप प्रसूती झाली.  सुशीला पवार या सुखरूप आहेत. बाळाचे वजन कमी असल्याने दक्षता म्हणून बाळ व आईला अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड