शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

मनुष्यबळाअभावी मृत्यूला राेखणारे यंत्र पडले धूळखात; रायगड जिल्ह्यात २० व्हेंटिलेटर वापराविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 23:21 IST

रायगड जिल्ह्यात २० व्हेंटिलेटर वापराविना पडून

आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचारासाठी काेणाला ऑक्सिजन लागत आहे, तर काेणाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. मात्र, बेडची कमतरता जाणवत असल्याने उपचारात अडचणी येत आहेत. सरकारने रायगड जिल्ह्यासाठी २५ व्हेंटिलेटर पाठवले हाेते. मात्र, त्यातील २० व्हेंटिलेटर सध्या धूळखात पडले आहेत. आराेग्य विभागाकडे कुशल मनुष्यबळ नसल्याने व्हेटिंलेटरचा वापरच हाेत नसल्याचे समाेर आले आहे. 

काेराेनाचा शिरकाव झपाट्याने हाेत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयामधील बेडची कमतरता जाणवत आहे. काेराेनाने स्वतःमध्ये बदल केल्याने ताे अधिक घातक झाला आहे. त्यामुळे त्याचा मुकाबला करताना थाेडे कठीण जात आहे. रुग्णांची प्रकृती खालावत असल्याने त्याला ऑक्सिजन बेडची आवश्यकता लागत आहे. अधिकच त्रास झाल्यास रुग्णांना व्हेंटिलेटरचा सपाेर्ट द्यावा लागत  आहे. 

पहिल्या लाटेच्या वेळी सरकारने २५ व्हेंटिलेटर जिल्ह्यासाठी दिले हाेते. व्हेंटिलेटरवरील सपोर्ट रुग्णांसाठी वरदान ठरणारा आहे. मृत्यूला राेखण्याचे सामर्थ्य हा यंत्रामध्ये  आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरची अतिशय गरज असतानाही  त्याचा वापर हाेताना दिसत  नाही. आराेग्य यंत्रणेकडे आधीच मनुष्यबळाची कमतरता आहे.  त्यातच त्यांना भागवावे लागत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर उपलब्ध  असतानाही त्यांचा वापर करता येत नसल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. 

एखाद्या ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज आहे हे मान्य, परंतु तेथे फिजिशियन डाॅक्टर नसेल तर व्हेंटिलेटरचा उपयाेग कसा करणार, त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही गरज आहे. त्यामुळे गरज असतानाही त्यांचा वापर करता येत नसल्याची खंत आराेग्य विभागातील एका डाॅक्टरने व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी कळंबाेळी येथील स्वस्थ रुग्णालयाने पाच व्हेंटिलेटरची मागणी केली हाेती. रुग्णांच्या सेवेसाठी त्याचा उपयाेग हाेणार असल्याने तातडीने स्वस्थ रुग्णालयाला कर्ज स्वरूपात व्हेंटिलेटर देऊ केल्याचे जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले. अद्यापही २० व्हेंटिलेटर शिल्लक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण २१५ व्हेंटिलेटर बेड आहेत. रायगड ग्रामीण रुग्णालयात १८ व्हेंटिलेटर आणि पनवेल महापालिका क्षेत्रात १०१ असे एकूण ११९ व्हेंटिलेटर वापरात आहेत. काही ठिकाणच्या रुग्णालयातील रुग्णांना कधीही व्हेंटिलेटरची आवश्यकता लागू शकते. मात्र, तेथे तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने व्हेंटिलेटरचा काहीच उपयाेग हाेणार नाही. यासाठी प्रशासनाने खासगी डाॅक्टरांच्या मदतीने सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटरचा वापर करण्याचे ठरवले हाेते. मात्र, खासगी डाॅक्टर स्वतःच त्यांच्या रुग्णालयात रुग्णांना उपचार देत आहेत. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजन