शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसल्याने विकासकामे ठप्प - पंडित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 02:32 IST

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते

मुरुड जंजिरा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगतात. राज्य सरकारकडूनही तशाच घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधी न आल्याने अनेक कामे रखडली आहेत. राज्य सरकारच्या सी.आर.एफ. फंडाचे दोन हजार कोटी रु पये येणे बाकी आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी खर्च असलेले रस्ते मंजूर केले; परंतु जिल्ह्याला पैसे लाखांत येत असतील तर रस्त्याची कामे जलद गतीने कशी पूर्ण होणार? याशिवाय भारतीय ब्रॅण्ड असलेले डांबर रस्त्यासाठी वापरण्यास सांगितले जाते. सध्या या डांबराचा तुटवडा असल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाही. याबाबत नागरिकांनी मंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. खोट्या भूलथापांना बळी न पडता मतदान करावे, असे प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार पंडित पाटील यांनी केले.

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक मनोज भगत, आशिष दिवेकर, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकू, रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, माजी सरपंच अजित कासार आदी उपस्थित होते.शहरातील जनतेने शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. तरीही निधीअभावी विकासकामे झाली नाहीत. भाजपाच्या काळात प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्यात आला आहे. हे सरकार श्रीमंतांचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

नवीद अंतुले हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र आहेत. काँग्रेस पक्षाने अंतुले यांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बनवले. मात्र, त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने दिलेल्या योगदानाचा त्याला विसर पडल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतकरी कामगार पक्षाचे मुरु ड तालुका चिटणीस मनोज भगत यांनी भाषणात, कार्यकर्त्यांनी घराघरांत प्रचार करून लोकांची मते वळवली पाहिजेत. बूथ कार्यकर्त्यांनी मुरु ड नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे काम करून शहरात जास्तीत जास्त मते पाडण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन श्रीकांत सुर्वे तर आशिष दिवेकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगड