शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:49 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत.

दासगाव - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत. यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी झालेल्या माती भराव आणि खोदकामामुळे पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यातून वाट काढणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून अपघाताची शक्यताही आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वाट काढण्यासाठी ठेकेदार कंपनीने तत्काळ जेसीबी यंत्रणा उभी करून पाण्याचा निचरा केला.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून ऐन पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणी एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून खोदकाम झाले आहे. शिवाय माती भरावदेखील झाला आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात महामार्गावर पावसाचे पाणी साचू लागले आहे. डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावर येऊन तुंबून राहत आहे. तसेच महामार्गावर आलेले पाणीदेखील गटारात जाण्याचा मार्ग माती भरावामुळे बंद झाला आहे. महामार्गाला असणारी गटारेही साफ न केल्याने आणि या गटारात भरावाची माती पडल्याने रस्त्यावरील पाणी वाहून जात नाही. साचून राहिलेल्या पाण्याने वाहनचालक त्रस्त झाले असून अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.महामार्ग बांधकाम विभागाकडून प्रतिवर्षी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची साफसफाई केली जाते. मात्र, या वर्षी चौपदरीकरण कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने गटारे साफ केली नाहीत. पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ न करताच आपली जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर सोपवली आहे.यामुळे इंदापूर ते पोलादपूरपर्यंत ठिकठिकाणी सखल भाग असलेल्या मार्गात पाणी साचून राहिले आहे. महाड आणि परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोट रस्त्यावर येत असतो. या वर्षी खोदकाम झाल्याने पाण्याबरोबर मातीदेखील महामार्गावर येत आहे. यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना तयार झालेल्या चिखलाने अपघात होण्याचीही शक्यता आहे. महामार्ग बांधकाम विभाग सध्या आपली जबाबदारी एल अ‍ॅण्ड टी कंपनीवर सोपवली आहे.रस्त्यावर साचलेल्या पाण्याला जाण्यास वाट न मिळाल्याने एल अ‍ॅण्ड टी कंपनीची तारांबळ उडाली. बराच काळ महामार्ग वाहतुकीला अडचण आली. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने याबाबत दखल घेत महामार्गावरील साचलेले पाणी दूर करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस