शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दररोज दहा ग्लास पाणी प्या; उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळा

By निखिल म्हात्रे | Updated: May 19, 2024 17:31 IST

वाढत्या उन्हाळ्यात दक्षता घ्या; लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार करा

अलिबाग : उन्हाळा आला की आपल्याला डिहायड्रेशनची समस्या सतावते. शरीरात पाणी कमी असेल तर ही समस्या निर्माण होते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे लागते. अनेकदा डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे काहीजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे याचा त्रास वाढतो. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.

सध्या उष्णतेचे प्रमाण हे फारच वाढत आहे. त्यातून वातावरणात देखील सतत बदल होत आहेत. त्यामुळे आपण याकडे नीट लक्ष देणे फार आवश्यक असते. दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याचा अर्थ निदान आठ ते दहा ग्लास तरी आपण रोज पाणी पिणे आवश्यक असते. सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्याला दररोज जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. आपल्या शरीराला नीट हायड्रेड ठेवायला हवे. कामाच्या गडबडीत आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. आपल्याला पाणी पिणे जमले नाही तर ताज्या फळांचा रस पिणे महत्त्वाचे असते. जाणून घ्या कारणे -सोडियम, मग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आदी इलेक्ट्रोलाइटसच्या कमतरतेमुळे ही डिहायड्रेशनची समस्या भेडसावू शकते.त्यातून मधुमेहाच्या लक्षणांमुळेही हा त्रास होऊ शकतो जसे की, सतत लघवीला होणे, यात आपल्या शरीरातील साखर वाढली की मग शरीर ही साखर लघवीतून बाहेर टाकते. तेव्हा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुर्लक्ष नको महिलांमध्ये -डिहायड्रेशनची समस्या वाढल्यास तोंड कोरडे पडणे, जास्त तहान लागणे, लघवी कमी प्रमाणात होणे किंवा न होणे. जास्त प्रमाणात धाप, लागणे, ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. डिहायड्रेशनची लक्षणे -साधारणपणे जास्त प्रमाणात पिवळी लघवी होणे हे एक प्रामुख्याने दिसणारे लक्षण आहे. जेव्हा लघवी पिवळी होत असेल तर समजावे की डिहायड्रेशनचा त्रास आहे. त्यानंतर श्वासाची दुर्गंधी येणे ही लक्षणे दिसू लागतात. डिहायड्रेशन झाल्यास जास्त प्रमाणात घाम येणे किंवा मग अजिबातच घाम न येणे ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसताच यावर तत्काळ उपचार घ्यावेत.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग