शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांकडून सांडपाण्याचा गटारात निचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 00:24 IST

सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.

सिकंदर अनवारे दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी थेट गटारांमध्ये सोडत आहेत. हे सांडपाणी गटार मार्गाने थेट सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.गेली तीन महिने करोनामुळे संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन आहे.आशा परस्थितीमध्ये देखील महाड औद्योगिक क्षेत्रातील जवळपास बहुतेक कारखाने हे सुरूच आहेत. गेली पंधरा दिवस पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे.याचाच फायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी कारखान्यांना लागून असलेल्या सार्वजनिक गतारांमध्ये सोडले आहे. सध्या हे सर्व गटारे हिरवी, पिवळी, लाल झाली आहेत. या सर्व करखंदारांवर या संबंधित असलेल्या कोणत्याच शासकीय खात्याचा वचक राहिलेला दिसून येत नाही. गटार मार्गे सोडले जाणारे हे पाणी थेट सावित्री खाडीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीमध्ये दुर्गंधी पसरत असून खाडी किनारी असलेली भातशेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.।मणीराम आॅर्गनिकस या कारखान्याचा पाणी गटारामध्ये येत होता. नमुने घेऊन कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात तपासणी सुरू आहे, जे कारखाने गटारामध्ये पाणी सोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.- सागर औटी, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ।कारवाईकडे दुर्लक्ष : अशा प्रकारे रसायन मिश्रीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांना आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. याचे कार्यालय देखील याच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. असे असताना देखील कारखानदार पाणी सोडण्याचे हे काम करत आहे. मात्र हे प्रदूषण नियंत्रण मंडळ या कारखानदारांवर कोणतीच कारवाई न करता दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिक करत असून नाराजी व्यक्त करत आहेत.