शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:35 IST

पनवेलमध्ये संसद भवनाच्या प्रतिकृतीचे स्वरूप

पनवेल : शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या पुतळ्याच्या सभोवताली संसद भवनाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. १४ एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस असून, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी बुधवारी  येथील कामाचा आढावा घेतला. 

पनवेल शहरात १९९१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उभारणी करण्यात आली. पनवेल शहरात पनवेल बसस्थानक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. १९९१ साली रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. 

पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर शिवाजी पुतळ्याप्रमाणेच आंबेडकर पुतळ्याचे सशोभीकरण करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केली होती. आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या मागणीला मान्यता देऊन ५५ लाखांची तरतूद करण्यात आली. बुधवारी या कामाची पहाणी शहर अभियंता संजय कटेकर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अभियंता सुधीर साळुंखे यांनी केली. संसद भवनाची प्रतिकृती तयार करून त्यावर आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.     

शहरातील शिवाजी पुतळ्याचे केलेले सुशोभीकरण अत्यंत विलोभनीय आहे. त्याच धर्तीवर बाबासाहेबांचे पुतळ्याचे सुशोभीकरण होणार असून, संसद भवनासह महाड चवदार तळे सत्याग्रहाचे तैलचित्र याठिकाणी रेखाटण्यात येणार आहे.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरBJPभाजपा