शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढविली : पाच तालुक्यांतील १६३ अंगणवाड्यांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:52 IST

रायगड जिल्ह्यातील केवळ कर्जत तालुक्यातील ४७ गावांतील १३५ अंगणवाडी क्षेत्रांकरिता लागू असणारी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली आहे.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील केवळ कर्जत तालुक्यातील ४७ गावांतील १३५ अंगणवाडी क्षेत्रांकरिता लागू असणारी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली आहे. जिल्ह्यातील आणखी पाच तालुक्यांतील ९८ गावांतील १६३ अंगणवाडी क्षेत्रांतील गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि तीन महिने ते सहा वर्षे या कालावधीतील बालकांकरिता लागू केली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ६ मार्च २०१८ रोजी दाखल केलेल्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिल्याने जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषणाची समस्या नियंत्रणात येवू शकणारआहे.अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना राज्यात १ डिसेंबर २०१५ पासून सुरू करण्यात आली. प्रसूतीदरम्यानचे माता-बाल मृत्यू आणि आदिवासी बालकांमधील कुपोषण समस्या यावर मात करण्यात या योजनेचे सकारात्मक परिणाम प्राप्त झाल्याने, स्त्री गरोदर असल्याने निश्चित झाल्यापासून बाळंतपणापर्यंत तसेच स्तनदा मातांना पहिले सहा महिने एक वेळ चौरस आहार देण्याचा निर्णय शासनाने २ आॅगस्ट २०१६ रोजी घेतला. त्यानंतर मातांच्या समस्या नियंत्रणात येवू लागल्या मात्र आदिवासी बालकांमधील कुपोषणाची समस्या नियंत्रणात येत नाही असे निष्कर्ष प्राप्त झाल्याने शासनाने याच योजनेअंतर्गत तीन महिने ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांच्या पोषणवृद्धीकरिता अंडी वा केळी असा आहार देण्याचा निर्णय घेतला. त्यातून आदिवासी बालकांमधील कुपोषणाची समस्या नियंत्रणात येत असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले असल्याची माहिती आदिवासी क्षेत्रात कार्यरत आणि रायगड जिल्हा पोषण सेवा देखरेख प्रकल्पाचे समन्वयक अशोक जंगले यांनी दिली आहे.माडा (सुधारित क्षेत्रविकास खंड)माडा (मॉडीफाईड एरिया डेव्हलपमेंट अ‍ॅप्रोच): आदिवासी प्रकल्पक्षेत्रालगतच्या प्रदेशात ज्या गावांमध्ये १० हजार लोकवस्ती आहे आणि त्यातील ५० टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्या असेल त्या गावांचा समावेश या खंडामध्ये केला आहे. महाराष्ट्रात एकूण ४३ माडा क्षेत्रे आहेत.मिनी माडा (सुधारित लघुक्षेत्र विकास खंड)प्रत्येक ५ हजार लोकवस्तीच्या २-३ गावांमध्ये मिळून ५० टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्या असेल तर अशा गावांचा समावेश मिनी माडा(सुधारित लघुक्षेत्र विकास खंड) यामध्ये केला जातो. महाराष्ट्रात असे २४ खंड आहेत.शासनाचे आदेशरायगड जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर केलेल्या प्रस्तावानुसार रायगड जिल्ह्यातील माडा व मिनी माडा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावांचा समावेश योजनेअंतर्गत करण्यात येऊ न गावातील अंगणवाड्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.माडा व मिनी माडा क्षेत्राअंतर्गत येणाºया अंगणवाडीकरिता चार सदस्यीय आहार समिती स्थापन करावी व संयुक्त बँक खाते सुरू करावे.आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बेलापूर, नवी मुंबई यांनी संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बाल कल्याण यांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश देखील शासनाने निर्गमित केले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड