शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे

By राजेश भोस्तेकर | Updated: November 5, 2022 12:42 IST

पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे. 

अलिबाग : पोलीस दलात होणारी भरती ही पारदर्शक, नियमांना धरून केली जाणार आहे. त्यामुळे भरती होणाऱ्या उमेदवारांनी आपल्या हिमतीवर आणि बुद्धी कौशल्याने पोलीस दलात सामील व्हा. पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे. 

राज्यात पोलीस विभागात अनेक पदे रिक्त आहेत. पोलीस विभागात रिक्त पदे भरावीत यासाठी शासनामार्फत राज्यात पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकाधिक तरुण तरुणींनी या पोलीस दलात सामील होण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर २०२२ चे आयोजन अलिबाग पोलीस परेड मैदानावर एक दिवसासाठी आयोजित केले होते. उमेदवाराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपस्थित तरुण तरुणींना मार्गदर्शन केले. यावेळी घार्गे यांनी पैसे देऊन अमिषाला बळी पडू नका असे आवाहन केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, गृह उप अधीक्षक जगदीश काकडे, मुरुड पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे, मांडवा पोलीस निरीक्षक राजीव पाटील यावेळी उपस्थित होते.

रायगड पोलीस दलात भरती होणारे उमेदवार हे परजिल्ह्यातील अधिक असतात. त्यामुळे काही वर्षाने पोलीस कर्मचारी हे आपल्या गावी बदली करून जात असतात. त्यामुळे रायगड पोलीस दलात पोलीस कर्मचारी याची रिक्त पदांची कमतरता भासत आहे. यासाठी होणाऱ्या पोलीस भरतीत रायगडातील अधिकाधिक तरुण तरुणींनी सहभाग घेऊन दलात सामील व्हावे अशी इच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मार्गदर्शन करताना बोलून दाखवली.

पोलीस दलात सामील होणाऱ्या तरुण तरुणीला भरतीचे नियम, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा बाबत मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत केले जाणार आहे. लेखी परीक्षेत बेसिक अभ्यासावर भर देणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत कशा पद्धतीने उमेदवार याला मार्क मिळू शकतात. याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले गेले. त्यामुळे भरती वेळी उमेदवारांना याचा अधिक लाभ होऊन मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील उमेदवार दलात सामील होण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आठ उपविभागीय अधिक्षक विभागात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले होते. साधारण आठ ते दहा हजार उमेदवार या शिबिरात सहभागी झाले होते.---जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुले मुली यांनी पोलीस दलात सामील व्हावे, यादृष्टीने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात लेखी परीक्षा, मैदानी चाचणी कशा पद्धतीने असते. याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. भरती प्रक्रिया किती पारदर्शक होणार, याबाबतही सांगितले असून कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. तरुणांनी आपल्या हिंमतीवर दलात सामील व्हावे लागणार आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड 

टॅग्स :PoliceपोलिसRaigadरायगडalibaugअलिबाग