शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दलाचे वर्चस्व

By निखिल म्हात्रे | Updated: December 14, 2023 16:19 IST

सीटीएनएस कार्यप्रणाली मध्येरायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिद्ध केली आहे.

निखिल म्हात्रे,अलिबाग : सीटीएनएस कार्यप्रणाली मध्येरायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिद्ध केली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये पुन्हा एकदा २०१ गुणांपैकी १९६ गुण प्राप्त करून १७.५१ टक्के गुणांसह राज्याच्या गुणांकनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

दरमहा पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत राज्यातील सर्व घटकांकडून मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. सन २०२२ प्रमाणेच २०२३ मध्ये देखील  सीटीएनएस प्रणालीच्या उत्तम कामकाजात सातत्य कायम ठेवतरायगड पोलीस दलाने दैदीप्यमान कामगिरीची घोडदौड सुरु ठेवली आहे.

सीसीटीएनाएस मार्फत करण्यात येणाऱ्या नियमित कामकाजामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करीत रायगड पोलीस दलाने सन २०२३ मध्ये जुलै व ऑक्टोबर मध्ये प्रथम क्रमांक, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जुन मध्ये द्वीतीय क्रमांक, जानेवारी, मार्च व सप्टेंबर मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करीत नियमित आपल्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ धागे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, कार्यालय येथे स्थापीत सीसीटीएनएस कक्ष व पोलीस ठाणेस नियुक्त प्रशिक्षीत पोलीस अंमलदार यांनी ही प्रशंसनिय कामगिरी केली आहे. याचीच दखल घेत रायगड पोलीस दलास सन २०२३ चे वार्षिक तृतीय क्रमांकाचे पारितोषीक देखील प्राप्त झाले आहे.

रायगड जिल्हयाने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सीसीटीएनएस मधील फॉर्मची तत्काळ नोंदणी, सिटीझन पोर्टल, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामकाज करीत यश प्राप्त केले आहे. अटक होणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात हि प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे. पोलीस ठाण्यात अटक होणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सदर प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत असुन रायगड जिल्हा पोलीस दलाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरु राहील असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.रायगड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या अपार मेहनतीचे हे यश आहे. यामध्ये सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता प्रयत्नशिल राहू असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडPoliceपोलिस