शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्यात ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची वानवा; नवजात शिशू दगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:21 IST

- अरुण जंगम म्हसळा : तालुक्यात शासकीय रुग्णालयाची वास्तू मोठी असली तरी उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा आरोग्य सुविधा ...

- अरुण जंगम

म्हसळा : तालुक्यात शासकीय रुग्णालयाची वास्तू मोठी असली तरी उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने गेली अनेक वर्षे शहरी आणि ग्रामीण भागातील रु ग्णांची हेळसांड होत आहे.

म्हसळे तालुक्यातील सुमारे दहा हजार लोकवस्तीकरिता मेंदडी पंचायत समितीच्या गणात दहा वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालय दर्जाचे प्राथमिक आरोग्यकेंद्र उभारण्यात आले. मात्र, या भव्य इमारतीत रुग्णांना आवश्यक आणि मूलभूत आरोग्यसेवाही उपलब्ध होत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामीण रु ग्णालयासह प्राथमिक आरोग्यकेंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. मेंदडी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र डॉक्टरविना ओस पडले आहे. येथील रु ग्णांंची गैरसोय टाळावी, याकरिता तातडीने नवीन डॉक्टरची नेमणूक करावी, अशी लेखी मागणी माजी सभापती महादेव पाटील यांनी रायगड जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याकडे केली आहे.

मेंदडी येथे रुग्णांची तात्पुरती सुविधा म्हणून तालुका आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्यकेंद्र पाभरे येथील डॉ. सुशांत गायकवाड यांची अर्धवेळ नियुक्ती केली आहे. रुग्णालयात अन्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असून, गंभीर रुग्णांना आवश्यक असणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने, खासगी दवाखान्यात किंवा तालुक्याबाहेर जाऊन उपचार घ्यावे लागतात. वेळीच उपचार मिळत नसल्याने कधी कधी रु ग्ण प्रवासातच दगावण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मेंदडी प्राथमिक आरोग्यकेंद्र बंद असल्याने काळसुरी येथील देवदास सावकार यांनी त्यांची मुलगी मयूरी भोपी हिला पहिले बाळंतपण करण्यासाठी गुरुवार, ११ आॅक्टोबर रोजी सकाळी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी सायंकाळी तिला खासगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

मात्र, तोपर्यंत उशीर झाल्याने आणि अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने तिची प्रसूती ग्रामीण रुग्णालयातच झाली, या वेळी नवजात शिशूची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून, त्याला महाडला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, तोपर्यंत बाळ दगावले होते. या वेळी डॉक्टराच्या हलगर्जीमुळे बाळ दगावल्याची तक्रार मयूरीच्या कुटुंबीयांनी केली आहे.संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी

  • ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने याआधीही दोन नवजात शिशू दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. बाळंतपणाकरिता दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टर किंवा तज्ज्ञ परिचारिका नसल्याने, नवजात शिशू दगावण्याचा किंवा गरोदर मातेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. म्हसळा येथे घडलेल्या घटनेची जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी वेळीच दखल घेऊन, संबंधित डॉक्टरबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देवदास सावकार यांनी तक्रार अर्जात केली आहे.

 

  • म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार श्रीवर्धन येथील डॉक्टर मधुकर ढवळे यांच्याकडे आहे, त्यांना या घटनेची माहिती दिली असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर वेळीच उपलब्ध झाले असते, तर नवजात शिशू वाचला असता, असे सावकार यांनी सांगितले.

 

  • म्हसळा तालुक्यातील बहुतांश भाग हा ग्रामीण लोकवस्तीचा आहे. येथील नागरिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र अपुºया मनुष्यबळाअभावी रुग्णांवर वेळीच योग्य उपचार होत नाही. परिणामी रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर