शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:38 IST

कर्जतमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाची गैरसोय

कर्जत : कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांची नेहमीच वानवा असते. शनिवारी येथील डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याने रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होण्यासाठी एका महिलेला उल्हासनगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांमधून संताप व्यक्त होत असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.कर्जतपासून नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कडाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फुलाजी पवार यांनी शनिवारी आपली मुलगी दीपिका गणेश आव्हाड हिला प्रसूतीसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणले होते. यावेळी तिच्यासोबत भाऊ, आई व अन्य तीन व्यक्ती होत्या. मात्र, यावेळी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर दारूच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महिलेवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवली, तसेच मद्यधुंद अवस्थेत असभ्य बडबडही केली. यावेळी पवार कुटुुंबीयांनी नाराजी व्यक्त करीत कडाव येथून रुग्णवाहिका मागून मुलीला उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्याने प्रसूती सुखरूप झाल्याने पवार कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.परंतु या प्रकारामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कारभार उघड झाला आहे. येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांवर नेहमीच मनमानी करतात. रुग्णालयातील अस्वच्छता, रुग्णसेवेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याप्रकरणी लोकप्रतिनिधी तरी लक्ष देणार का? असा प्रश्न रुग्णांकडून उपस्थित होत आहे.कर्जत तालुका हा आदिवासीबहुल असून कुषोषणाचे प्रमाण अधिक आहे. सरकारकडून आरोग्य सेवांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो, मात्र लाभार्थींपर्यंत जर रुग्णसेवा पोहोचत नाही. या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून होत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर