शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आधी दुरुस्ती करा मगच कालव्यात पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:41 IST

कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याच्या दुरुस्ती नंतर अवघ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

- कांता हाबळे कर्जत : कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याच्या दुरुस्ती नंतर अवघ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील दुबार भात शेतीसाठी डिसेंबर महिन्यात पाणी सोडल्यास ते पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे प्रथम कालव्याची डागडुजी करा मगच पाणी सोडा, अशी जोरदार मागणी गौरकामथ आणि वदप आदी गावांतील शेतकºयांनी पाटबंधारे अभियंत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली.कर्जत तालुक्यातील गौरकामथ येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता राजनाल्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-२ अमित पारधी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक श. रु. माने, मोजणीदार राम व्ही. वाघ, हनुमान कालेकर, मजूर सुरेश सोनावळे उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रश्नाचा भडीमार करत अधिकाºयांची बोलती बंद केली. शेतकºयांनी नाल्याची दुरवस्था झाल्याचे अधिकाºयांना सांगितले. मागील वर्षीही याबाबत निवेदन दिले होते. तेव्हा राजनाल्याची डागडुजी करून स्वच्छता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नाल्याचे काम न केल्याने नाल्यात जंगली झाडेझुडपे वाढली आहते. नाल्याच्या कडेची माती नाल्यात ढासळल्याने नाल्यात गाळ साचला आहे. अद्यापपर्यंत काहीच काम केले नाही. गेल्या वर्षीही आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते आणि आताही तेच आश्वासन देतात. आता आम्हाला आश्वासन नको ठोस काम पाहिजे, अशी मागणी शेतकºयांनी केली. वदप येथील १३-बी पोटनाल्यालगत पाइप फुटल्याने नाल्याचे पाणी शेजारील तलावात जाते, त्यामुळे तलावाची पातळी वाढून तलावाचा बांध फुटण्याची शक्यता आहे. तसेच तलावाजवळ वस्ती असल्यामुळे तलावाचा बांध फुटल्यास संपूर्ण पाणी त्या वस्तीत शिरण्याची भीती असून, मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागेल. परिणामी, वस्तीमध्ये भीतीचे सावट पसरले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बैठकीत बळीराम खंडागळे, खंडू शिंदे, जगदीश पाटील, कृष्णा चव्हाण, राजेश पाटील, पंकज पाटील आदी शेतकºयांनी समस्या मांडल्या.वदप तळ्यालगत असलेला राजनाल्याचा आउट लेट पाइप फुटल्याने तलावात पाणी शिरून तलाव ओव्हर फ्लो होत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात, घरांत पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे.- जगदीश पाटील,शेतकरी, वदप

टॅग्स :Raigadरायगड