शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेविकेला मोबाइलवरून तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:56 IST

मुरुडच्या माजी नगरसेविका नादिया ढाकम यांना त्यांच्या पतीने मोबाइलवरून तलाक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आगरदांडा : मुरुडच्या माजी नगरसेविका नादिया ढाकम यांना त्यांच्या पतीने मोबाइलवरून तलाक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांचे पती ताबिश इब्राहिम ढाकम यांच्या विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यात प्रथमच असा प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.नादिया (३८, रा. दत्तवाडी) यांचे पहिले लग्न २००३ मध्ये अशफाक जैनु अबिदीन इद्रुस यांच्याशी झाले होते. ११ वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर ताबिश इब्राहिम ढाकम यांच्याबरोबर ७ जानेवारी २०१९ रोजी नेरळ येथील मस्जिदीमध्ये त्यांनी मुस्लीम धर्मानुसार दुसरे लग्न केले. ताबिश यांनी आपले पहिले लग्न झाल्याचे न सांगता नादिया यांच्याबरोबर दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर नादिया यांनी त्याच्याकडे विचारणा केली.त्यावेळी नादिया यांना मुरुड येथे दुसरी सदनिका घेऊन देणार, तसेच आठवड्यातील तीन दिवस नादिया आणि तीन दिवस पहिल्या पत्नीकडे राहणार असल्याचे ताबिश याने घरच्यांसमोर कबूल केले होते. मात्र, लग्नानंतर १५ दिवस उलटल्यानंतरही त्याने नवीन सदनिका खरेदी केली नाही. त्यानंतर अनेक वेळा पती ताबिश याला सदनिकेबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत असे. त्यामुळे नादिया पहिल्या पतीच्या घरी राहत होत्या.दरम्यान, ताबिशपासून नादिया यांना दिवस गेले होते. याबाबत त्याला सांगितल्यावर ‘मला आता मूल नको’, असे सांगून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने गर्भपाताची गोळी खाण्यास दिल्याने नादिया यांची प्रकृती बिघडली. नादिया डॉक्टरकडे गेल्या असता चुकीच्या गोळ्यांमुळे त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर पती ताबिश इब्राहिम ढाकम यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांना घरी येऊन शिवीगाळी व दमदाटी केली. त्यानंतर वारंवार फोनवर संपर्क केला असता शिवीगाळी करून तलाकच्या धमक्या दिल्या. शेवटी १ जुलै रोजी नादिया ताबिश याच्या घरी राहण्यास गेल्या असता, त्याने मारहाण करून त्यांना घराबाहेर काढले. तसेच फोन करून तलाक दिल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नादिया यांनी पोलिसांत तक्रार दिली. यात पतीने आपणांस शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.