शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात शिक्षक बदली घोटाळ्याचे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:44 IST

रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील घोटाळ्याबाबत तपास संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमधील हे बदली घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे आहे, परंतु तीन महिने उलटले तरी, अलिबाग पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे.

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील घोटाळ्याबाबत तपास संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमधील हे बदली घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे आहे, परंतु तीन महिने उलटले तरी, अलिबाग पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब माजी आमदार ठाकूर यांनी उघडकीस आणली होती. २१ शिक्षकांच्या बदलीसाठी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या बनावट सह्या आणि शिक्के वापरण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी प्रखर विरोध केल्याने अखेर शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी अलिबाग पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.बनावट सह्या केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांत तक्र ार दाखल करणाऱ्या शिक्षण विभागाने तक्र ारच अशी दाखल केली आहे की ती निकाली निघावी. कारण बनावट सह्यांचे आदेश सादर करणाºया शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडे आहे आणि गेली दोन वर्षे चौकशी सुरू आहे तर या शिक्षकांनी त्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सहीची बनावट पत्रे शिक्षण विभागाकडील कोणत्या व्यक्तीने दिली हे सांगितलेले नाही हे म्हणणेच तकलादू असल्याचे सावंत यांनी सांगितले.अधिकारी रजेवरतक्र ार दाखल करणारे शिक्षण अधिकारी हे रजेवर गेले असल्याने या प्रकरणात विलंब झाला होता. आता लवकरच तपासाचे परिणाम दिसून येतील, अशी माहिती दीड महिन्यापूर्वी अलिबागमधील पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी २४ मार्च रोजी दिली होती.

टॅग्स :Teacherशिक्षकRaigadरायगडnewsबातम्या