शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नवघर जिल्हापरिषदेच्या शाळेत आता संगणकाचे धडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 18:14 IST

आश्रय ट्रस्टच्या उपक्रमानं विद्यार्थ्यांसह पालकही सुखावले

अलिबाग: ग्रामीण भागातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना इंग्रजी व्यवस्थित लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे, यासाठी नवघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना संगणक लॅबची भेट देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच मिळालेल्या या भेटीनं विद्यार्थ्यांसह पालकही सुखावले आहेत. यासाठी अरुण व कुंदन व्होरा आणि कॅप्टन आर. राव व एन. राव या दोन दाम्पत्यांनी आश्रय ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. शुक्रवारी या उपक्रमाचा नवघर जिल्हा परिषदेच्या शाळेत शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आश्रय ट्रस्टचे विश्वस्थ अरुण व कुंदन व्होरा आणि कॅप्टन आर.राव व एन. राव यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे, शाळेचा शिक्षकवृंद आणि ट्रस्टचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी संगणकांची भेट मिळाल्याने सारे बालगोपाळ विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुखावून गेले होते.शुक्रवारी शैक्षणिक वर्षाची सुरुवाच होताच या उपक्रमाचा शुभारंभ झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना त्याच्या शैक्षणिक व व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने मोठी संधी निर्माण झाली आहे. तर जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक प्रक्रियेस आधुनिकतेचा नवा आयाम प्राप्त झाला असल्याची भावना रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 90 टक्के होती. येत्या दोन दिवसात ती 100 टक्के होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड