शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिल्हा नियोजन भवन इमारतीच्या उद्घाटनाला दसऱ्याचा मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मेळ बसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:55 IST

रायगड जिल्हा नियोजन समितीची सुसज्ज अशी इमारत बांधून पूर्ण झाली आहे. तब्बल ८ कोटी ६७ लाख रुपये या इमारतीसाठी खर्च करण्यात आले आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समितीची सुसज्ज अशी इमारत बांधून पूर्ण झाली आहे. तब्बल ८ कोटी ६७ लाख रुपये या इमारतीसाठी खर्च करण्यात आले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण इमारतीच्या उद््घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तारखेचा अद्यापही मेळ बसलेला नाही. त्यामुळे दसºयाच्या शुभमुुहूर्तावरच नूतन इमारतीमध्ये प्रवेश केला जाण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. विकासकामांसाठी मिळणाºया निधीचे योग्य नियोजन करता यावे यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्य करते. महसूल विभागाशी संबंध नसलेल्या या विभागाचे रायगड जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय जिल्हा प्रशासनाच्या इमारतीमध्येच आहे. नियोजन समितीच्या कार्याचा व्याप प्रचंड आहे. त्यासाठी पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या बैठकांचे सत्र नियमित पार पडत असते.बैठकीसाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची प्रमुख उपस्थिती असते. त्याचप्रमाणे नियोजन समितीचे अन्य सदस्य, जिल्ह्यातील प्रत्येक विभागाचे अधिकारी यांचाही समावेश असतो. त्याचबरोबर दैनंदिन कामासाठीही या कार्यालयाकडे येणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या इमारतीमधील सभागृह वापरावे लागायचे. यावर उपाय म्हणून नियोजन विभागाची स्वतंत्र इमारत असावी असा एक विचार तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी राजेश तितर यांच्या कालावधीत पुढे आला होता. तितर यांनीच याबाबतचा प्रस्ताव सरकारला देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती.जिल्हा नियोजन विभागाची इमारत उभारण्याला २०११-१२ साली मान्यता मिळाली. २०१२-१३ साली जुनी इमारत पाडण्याला सुरुवात करण्यात आली, तर २०१३-१४ साली इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. इमारतीसाठी आठ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी सरकारने दिला होता. काही किरकोळ कामे वगळता इमारतीमधून कामकाज केले जाऊ शकते. इमारत उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले जाणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे त्यांची तारीख घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र फडणवीस यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ अद्याप मिळालेला नाही. १२ आॅक्टोबरही वेळ मागण्यात आली होती. मात्र ती ही अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे नवरात्रोत्सव संपल्यावर दसºयाचा दिवस शुभ असल्याने दसºयाच्या दिवशी जिल्हा नियोजन इमारतीचे उद््घाटन होण्याची शक्यता आहे.इमारत ही दोन मजल्यांची आहे. इमारतीमध्ये तळमजल्यावर आठ वाहने सहजरीत्या पार्क करता येतील एवढी जागा आहे. स्वागतकक्षही येथेच आहे. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन विभागाचे सुसज्ज कार्यालय आहे. तसेच तेथे छोटेखानी सभागृह ठेवण्यात आले आहे. हे सभागृह वातानुकूलित करण्यात आले आहे. त्याच मजल्यावर स्टोअर रुम करण्यात आली आहे. दुसºया मजल्यावर प्रशस्त असे वातानुकूलित सभागृह उभारण्यात आले आहे. याच सभागृहाच जिल्हा नियोजन समितीच्या विविध बैठका पार पडणार आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या अन्य बैठकीसाठीही याचा वापर करता येणार आहे.यातील गंभीर बाब म्हणजे सुसुज्य इमारतीमध्ये पालकमंत्र्यांसाठी स्वतंत्र कॅबिन न करता विश्रामगृह आणि अ‍ॅन्टी चेंबर केला आहे.इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. उद््घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेण्याचा प्रयत्न पालकमंत्री रवींद्र चव्हाण करत आहेत. लवकरच त्यांची वेळ घेतल्यावर इमारतीचे उद्घाटन करण्यात येईल.- सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी

टॅग्स :Raigadरायगड