शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका इमारतीचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:40 IST

बोर्ली मांडला : जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या परिचारिका अभ्यासक्रम व हॉस्टेल इमारतीचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत राहिले आहे.

अमुलकुमार जैन बोर्ली मांडला : जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या परिचारिका अभ्यासक्रम व हॉस्टेल इमारतीचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत राहिले आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेले काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या इमारतीसाठी पूर्ण निधी सार्वजनिक बांधकामकडे असूनही ठेकेदाराने अजून काम पूर्ण केलेले नाही. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.जिल्हा रु ग्णालयात परिचारिका अभ्यासक्र म कोर्स शासनातर्फे घेतला जातो. त्याचबरोबर परिचारिका अभ्यासक्र मासाठी प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधाही जिल्हा रु ग्णालयात करण्यात येते. मात्र, जिल्हा रु ग्णालयात पूर्वी परिचारिका अभ्यासक्र म सुरू असलेली इमारत जुनी झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी शासनाकडे नव्या इमारतीसाठी निधी मागण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने नव्या परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेल इमारतीसाठी निधीची तरतूद केली. यामध्ये परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेलची नवी इमारत तळमजला व दोन मजले अशी रचना केली आहे. जिल्हा रु ग्णालयात जुनी ओपीडी सुरू असलेल्या इमारतीच्या जागेवर ही इमारत प्रस्तावित केली आहे. याबाबतची निविदा शासनाने सार्वजनिक बांधकाम मार्फत काढण्यात आली.सार्वजनिक विभागाने निविदा काढून या कामाची वर्क आॅर्डर २७ आॅगस्ट २०१३ रोजी मंजूर करण्यात आली. परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेलसाठी २ कोटी २० लाखांची सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीस वर्कआॅर्डर देण्यात आली. या इमारतीचे काम २४ महिर्न्यंच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या इमारतीचा २४ महिन्यांचा कालावधी उलटून पुढील २ वर्षे उलटली, तरी काम अजून अपुरेच राहिलेले आहे.आतापर्यंत २ कोटी २० लाखांपैकी १ कोटी ४ हजारांचे काम पूर्ण झाले असून ठेकेदारास हे बिल अदा केले आहे. असे सार्वजनिक बांधकामचे स्वीय सहायक अजय खोब्रागडे यांनी सांगितले.त्याचबरोबर ठेकेदारास काम करताना रेतीची समस्या उद्भवली असल्याने काम अपुरे राहिले असल्याचे खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.जिल्हा रु ग्णालयात परिचारिका अभ्यासक्र म कोर्ससाठी दरवर्षी ४० ते ५० विद्यार्थी प्रवेश घेतात. याच हेतूने नव्या इमारतीमध्येच अभ्यासिका वर्ग व हॉस्टेल सुविधा करण्यात येणार आहे. मात्र, शासनाने या इमारतीसाठी निधीची तरतूद करूनही ठेकेदारामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम अजून अपुरे राहिलेले आहे.या इमारतीच्या अपुºया राहिलेल्या कामास जेवढा ठेकेदार जबाबदार आहे, तेवढाच सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या कामाचा कालावधी निघून गेला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम पूर्ण करण्याबाबत विचारणा का केली नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा रु ग्णालयात सुरू असलेले परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेल इमारतीचे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही इमारतीचे काम रखडलेले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार व तोंडी सूचना दिल्या आहेत. इमारतीचे काम लवकर पूर्ण व्हावे, जेणेकरून याचा वापर आम्हाला करता येईल.- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकि त्सक