शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

जिल्ह्यात साकारले २,९०४ वनराई बंधारे, १५ युवकांना मिळणार व्यावसायिक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 3:53 AM

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदाच्या पावसाळ््यानंतर जिल्ह्यात दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले.

अलिबाग : ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदाच्या पावसाळ््यानंतर जिल्ह्यात दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. यासाठी तब्बल ४२ हजार ७० लोकांचा सहभाग आणि श्रमदानातून १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले आहे. लोकसहभागातून बंधारे बांधण्यात आल्याने १५ कोटी ४२ लाख पाच हजार रुपयांची बचत झाली आहे. अडवलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग पिकाबरोबरच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी होणार आहे.पेण खारेपाट, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, खालापूर, पनवेल आणि अलिबाग तालुक्यात जानेवारीपासूनच काही भागात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. मात्र, ग्रामस्थ, शाळकरी मुले, शासकीय अधिकारी, एनसीसी विद्यार्थी, तरुण, सामाजिक संस्था यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियानात पुढाकार घेतल्याने आज परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यात वनराई बंधारे झाल्याने रब्बी हंगामातील भाजीपाला, तृणधान्य पिकाला पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर कुटीर उद्योगांना पाणीही मिळणार आहे.बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवल्याने भूजलपातळी परिणामी, विहिरींची जलपातळी वाढल्याचा अनुभव गेल्या सहा-सात वर्षांत ग्रामस्थांना आला आहे. त्यामुळे वनराई बंधारे बांधण्यात, त्याकरिता श्रमदान करण्यात जिल्ह्यातील तरुणाई पुढाकार घेत आहेत. त्यामुळे यापुढे सुशिक्षित बेरोजगार युवकांना जलसंवर्धनाच्या कामात व्यावसायिक संधी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.जलयुक्त शिवार अभियान, जल व मृदसंधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाहाय्य योजना २ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातून १५ लाभार्थ्यांची निवड करण्यात येत असून, त्याकरिता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णयान्वये, राज्यात जलयुक्त शिवार अभियान, जल व मृदसंधारणची कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी उत्पादन संस्था, नोंदणीकृत शेतकरी गटास, बेरोजगारांच्या सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्रसामग्री (अर्थमुव्हर्स) खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि कर्जावरील व्याज शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८पर्यंत राहाणार आहे. रायगड जिल्ह्यासाठी १५ बेरोजगार युवकांना स्वत:चा २० टक्के रकमेचा किमान हिस्सा भरून या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार आहे. लाभार्थी निवडीसाठी प्रथम सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगारांच्या सहकारी संस्था, नोंदणीकृत गटशेती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, असा प्राधान्यक्र म राहाणार आहे.जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी तथा जिल्हा मृदसंधारण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) तथा जिल्हा संधारण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड यांचा समावेश राहाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार युवकांनी ३१ जानेवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. निवडप्रक्रिया पूर्ण करून १३ ते २० फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष कर्ज अदा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी पुढे यावे व आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष तथा जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बी. बी. शेळके व रायगड जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक पी. एम. खोडका यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड