शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्याचा सर्वसाधारण विकास आराखडा मंजूर, जिल्हा नियोजन समिती बैठक,  १७४ कोटी ७० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:22 IST

रायगड जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी १७४ कोटी ७० लाख रुपयांच्या सर्वसाधारण विकास आराखड्यास शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी १७४ कोटी ७० लाख रुपयांच्या सर्वसाधारण विकास आराखड्यास शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.या व्यतिरिक्त विशेष घटक योजनेअंतर्गत २४ कोटी ६६ लाख ७५ हजार रुपये, तर आदिवासी उपाययोजनेसाठी ५५ कोटी ९५ लाख ३४ हजार रु पयांच्या तरतुदीसही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच यावेळी जिल्हाच्या प्रश्नांसाठी केल्या जाणाºया तरतुदींचा आढावाही घेण्यात आला.बैठकीस रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. मनोहर भोईर, आ. प्रशांत ठाकूर, जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सर्व विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.ग्रामीण रस्त्यांसाठी३३ कोटी रु पयांची तरतूदजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे, साकव तसेच रस्ते दुरु स्तीच्या कामांसाठी ३३ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळा दुरु स्तीसाठी २ कोटी, आरोग्य सुविधा व दवाखाने आदींसाठी ८ कोटी रु पये, पशूसंवर्धन विभागासाठी ३ कोटी रु पये, वन विभागासाठी १३ कोटी रुपये, तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कार्यालये बांधणे, गावांत स्मशानभूमी बांधणे आदींसाठी ७ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे.जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठकजिल्ह्यातील रस्त्यांच्या गंभीर समस्येबरोबरच अन्य अनेक समस्यांवर शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नाही. जनसामान्य माणूस या सर्व समस्यांमुळे पूर्ण गांजला असल्याचे या पार्श्वभूमीवर उपस्थित विविध लोकप्रतिनिधींनी जाब विचारण्याचा पवित्रा या बैठकीत घेतला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विकासकामांसंदर्भात येत असलेल्या अडचणी व प्रश्नांसंदर्भात लवकरच एक सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री महेता यांनी या वेळी बैठकीत दिले.नियोजन भवनाचे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेशजिल्ह्यात अलिबाग येथे उभारण्यात येत असलेले जिल्हा नियोजन भवनाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून नियोजन भवन कार्यान्वित करण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री महेता यांनी दिले.तीन पर्यटन स्थळे ‘ब’ वर्गातसमाविष्ट करण्यासाठी ठरावजिल्ह्यातील शिवथरघळ (ता. महाड), मुरु ड-जंजिरा आणि झोलाई देवस्थान विन्हेरे (ता. महाड) या तीन पर्यटनस्थळांचा ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळांत समावेश करण्यात यावा, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव पुढील कार्यवाहीकरिता शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.महाराष्ट्र वार्षिकी देऊननवनिर्वाचित सदस्यांचे स्वागतआजची बैठक ही जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच बैठक होती. या सर्व सदस्यांचे स्वागत गुलाबपुष्प व महाराष्ट्र वार्षिकी हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेले पुस्तक देऊन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री महेता म्हणाले, नवनिर्वाचित सदस्यांनी हे पुस्तक वाचावे, जेणेकरून या अभ्यासपूर्ण पुस्तकातील माहितीचा उपयोग सदस्यांना जिल्ह्याच्या नियोजनात योगदान देताना होईल.

टॅग्स :RaigadरायगडPrakash Mehtaप्रकाश मेहता