शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नऊ महिन्यांत २५ लाख दंड वसूल, मद्यपींवर कारवाईचा बडगा : ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या तब्बल एक हजार ६९१ केसेसची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:41 IST

रायगड जिल्ह्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या तब्बल एक हजार ६९१ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये न्यायालयाने कमीत कमी दंड आकारल्याने सुमारे २५ लाख रुपयांचाच महसूल प्राप्त झाला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या तब्बल एक हजार ६९१ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये न्यायालयाने कमीत कमी दंड आकारल्याने सुमारे २५ लाख रुपयांचाच महसूल प्राप्त झाला आहे. दंडाची रक्कम जास्तीत जास्त दोन हजार रु पये केली असती, तर तब्बल ३३ लाख ८२ हजार रु पयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला असता, असे मत रायगड जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. रायगडच्या वाहतूक पोलीस शाखेने १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत ही कारवाई केली.राज्यात मद्यप्राशन करून वाहन चालवून मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर न्यायालयामार्फत महामार्गावरील परमिट रु म व बार, वाइन शॉप बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महामार्गावरील अनेक बार, परमिट रु म, वाइन शॉप बंद झाले आहेत. त्यामुळे अवैध मद्य धंदे तेजीत आले. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांविरोधात रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेमार्फत जिल्ह्यात मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्ग, अंतर्गत मार्ग, शहरातील मुख्य नाक्यानाक्यावर वाहतूक पोलीस तपासणीसाठी तैनात झालेले दिसतात. मद्य पिऊन वाहन चालविणाºया चालकाला तपासणीसाठी थांबविले जाते. मद्य प्राशन केले असल्याने मद्यपी चालकाला पोलीस ठाण्यात आणून त्याची ब्रेथ अल्कोहोल मशिनद्वारे तपासणी केली जाते. या तपासणीत ३० मिलीपेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण आले तर मद्यपीवर कारवाई करुन मद्यपींना न्यायालयात हजर केले जाते. न्यायालय हे मद्यपी आरोपींना १०० रु पयांपासून २००० रु पयांपर्यंत दंडाची शिक्षा सुनावते.वाहतूक पोलीस हे रात्री अपरात्रीपर्यंत मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करतात. मात्र त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दंड भरून सोडून देते. याबाबत न्यायालयाने मद्यपींना जास्त दंड आकारणी केल्यास सरकारलाच महसूल मिळणार आहे. न्यायालयाने एक हजार ६९१ प्रकरणात प्रत्येकी दोन हजार रु पये दंड आकारला असता, तर ३३ लाख ८२ हजार रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला असता. त्याचबरोबर मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRaigadरायगड