शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना लवकर करणार, जिल्हाधिका-यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:50 IST

मुरुड-जंजि-यामधील असुविधांवर मंगळवारी ‘लोकमत’ने ‘मुरु डमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला.

गणेश चोडणेकर अलिबाग : मुरुड-जंजि-यामधील असुविधांवर मंगळवारी ‘लोकमत’ने ‘मुरु डमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याची तत्काळ दखल घेऊन, मुरुड-जंजिºयामधील ही गंभीर परिस्थिती बदलण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून हाती घेण्यात येतील, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मुरुड-जंजिºयामध्ये येणाºया पर्यटकांना अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मुरुड नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यटन माहिती केंद्र लवकरच स्थापन करण्यात येईल. त्याकरिता मेरीटाइम बोर्डाकडे आम्ही निवेदन देणार असल्याची माहिती मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली आहे. सिद्दींच्या राजवाड्यावर खासगी मालकी हक्क असल्यामुळे त्याकरिता शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘लोकमत’ने पर्यटन सुविधा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद. पर्यटकांच्या सुविधांकरिता नगरपरिषद सर्व ते प्रयत्न करेलच; परंतु अन्य शासकीय यंत्रणांकडून सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे नगरपरिषदेच्या पर्यटन व नियोजन समितीचे सभापती पांडुरंग आरेकर यांनी सांगितले. वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम लवकर करणे आवश्यक आहे. जंजिरा किल्ला पाहायला जाणाºया पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित जेट्टीची आवश्यकता असून, जेट्टीचे रुं दीकरण व पर्यटकांसाठी निवारा शेड करणे आवश्यक असून, मेरीटाइम बोर्डाने याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे आरेकर यांनी सांगितले. किल्ल्यावर जाणाºया रस्त्यालगत असणारी संरक्षण भिंत केव्हाही कोसळेल, अशा अवस्थेत असल्याने तेथे अपघात होण्याचा संभव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संरक्षक भिंत तातडीने बांधण्याकरिता आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे सांगून दरम्यान पर्यटक आणि नागरिकांनी मुरुडच्या सुंदर समुद्रकिनाºयावर स्वच्छता राखावी, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले आहे.मेरीटाइम बोर्ड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य आवश्यक‘लोकमत’ने मांडलेली समस्यांची वस्तुस्थिती शासनाने तत्काळ विचारात घ्यावी. जुन्या जेट्टीवर महिलांकरिता स्वच्छतागृह व चांगला रस्ता करणे गरजेचे आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्याकरिता डोंगरी येथील रस्त्याशेजारील डोंगरावर असलेले धोकादायक मोठे दगड सार्वजनिक बांधकाम खात्याने तत्काळ काढणे आवश्यक असल्याचे नगरसेवक विजय पाटील यांनी सांगितले. मुरुडचा सुप्रसिद्ध सिद्दी राजवाडा हा खासगी मालकीचा आहे; परंतु संबंधित मालकांशी चर्चा करून या राजवाड्याचे रूपांतर संग्रहालय (म्युझियम)मध्ये केले, तर येथील पर्यटनामध्ये मोठी वाढ होऊ शकेल. मुरुडच्या पर्यटन विकासाकरिता मेरीटाइम बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड