शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:58 IST

पेणमधील शेतकरी समाधानी; रब्बी हंगामाच्या कामाची लगबग सुरू

पेण : हेटवणे धरणाच्या ओलिताखाली येणाऱ्या १७०० एकर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या कालावधीत पिकणाºया भातशेतीसाठी कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले आहे. या परिसरातील जमीन पाण्याखाली आली असून, या दोन-चार दिवसांत भात पेरणीला प्रारंभ होणार आहे. यावर्षी नववर्षाच्या मुहूर्तावर पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांची कामे थोडीफार बाकी राहिली होती. ती आटोपताच शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सध्या पेण शहरात व ग्रामीण भागात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे, अशा थंडीत शेतीसाठी पाणी सोडल्याने सायंकाळी व रात्री वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. हा गारवा आंबा व इतर फळ उत्पादनासाठी आवश्यक असतो, त्यामुळे आंबा मोहोर ताटवे फुलू लागतील. शेतजमिनीत पाणी साचल्याने एकंदर गुलाबी थंडी अधिक जाणवत आहे. सकाळी या परिसरात धुक्याची दुलई पसरते. त्यामुळे दैनंदिन कामे सूर्यप्रकाश अर्थात उन्हे पडल्यावर सुरू होत नाहीत. सध्या या परिसरात बगळे व इतर पक्ष्यांच्या आगमनाने पक्षिगणांचा किलबिलाट ऐकू येतो. शेतकरी ओल्या चिखल मातीमध्ये नांगरणी करून ओलितावर भात बियाणे भिजवून पेरणीकरून हिरवे तृणपात्याची उगवण करेल.पुढील १५ ते २० दिवस रब्बीच्या हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त राहणार असून, खरीप हंगामातील पिकांना जो फटका बसला होता, ती कसर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करेल. उन्हाळ्यातील भातशेतीला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, याबरोबर मुबलक पाणी व खतांची मात्रा पिकांना मिळते. खात्रिशीर उत्पन्नाची हमी व पिकांवर रोगराईची भीती नसल्याने शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर होणाºया शेतीसाठी नेहमीच उत्सुक व आनंदी असतो.सिंचनाचे पाणी एप्रिल २०२० पर्यंत गरजेनुसार सोडण्यात येणार आहे. शेतकºयाची जशी मागणी असते, तसतसे पाणी कमी-जास्त प्रमाणात सोडण्यात येत असते, अशी माहिती प्रकल्प सूत्रांनी दिली. एकूणच सिंचनाचे पाणी जमिनीत सोडण्यात आल्याने येत्या महिन्याभरात येथील शिवारात शेतकरी व मजुरांची लगबग दिसून येईल. संपूर्ण शिवारात हिरवाईचा गालिचा पसरलेला दिसेल आणि येथील वातावरण प्रफुल्लित राहील.