शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

निजामपूरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय; बाजारपेठ असल्याने सुविधा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 22:53 IST

माणगाव तालुक्यातील कुंभे, केळगण, जोर, बोरमाच, कुडूर्पेठ, थरमरी यांसारख्या दुर्गम डोंगराळ भागातून बरेचसे ज्येष्ठ नागरिकही बाजारपेठेमध्ये येत असतात.

गिरीश गोरेगावकर  

माणगाव : दिघी-पुणे महामार्गावरील महत्त्वाचे शहर आणि सदैव गजबजलेली बाजारपेठ असलेल्या निजामपूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे.निजामपूरसारख्या मध्यवर्ती गावामध्ये महसूल कार्यालये, राष्ट्रीयकृत आणि सहकारी जिल्हा बँक, आरोग्यकेंद्र, जवाहर नवोदय विद्यालय, महावितरण मुख्य कार्यालय, कनिष्ठ महाविद्यालय असल्याने दररोज हजारो लोक, शाळकरी विद्यार्थी येत असतात. विळे भागाड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतील नोकरवर्ग, खासगी डॉक्टरांकडे येणारे रुग्ण, बाजारहाट करण्यासाठी महिला खूप मोठ्या संख्येने येत असतात; परंतु शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रचंड गैरसोय होत असते. यापूर्वी बस स्थानकाशेजारी निजामपूर ग्रामपंचायतीच्या निधीतून स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले होते; परंतु नियमित स्वच्छता, साफसफाई होत नसल्याने त्याचा वापर कमी होत असे. कालांतराने ते स्वच्छतागृह दुर्लक्षित होऊन मोडकळीस आले आहे.

सद्यस्थितीत निजामपूर शहरात एकही सुस्थितीतील स्वच्छतागृह नसल्याने महिला तसेच शाळकरी विद्यार्थिनींना ओळखीच्या व्यक्तीकडे विनंती करून वैयक्तिक शौचालयाचा वापर नाइलाजाने करावा लागत आहे. तर काहींना ती सुविधाही मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. नैसर्गिक विधीचा वेग रोखल्याने पोटांच्या आजारांना बळी पडावे लागते; परंतु जनतेच्या वैयक्तिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. अशा मूलभूत सुविधांचा अभाव प्रत्यक्ष निजामपूरमध्येच असल्यामुळे नागरिकांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहेत.खेडेगावातून येणारे शाळकरी विद्यार्थी, खासगी दवाखान्यात येणारे रुग्ण आणि दैनंदिन बाजारहाटीसाठी येत असलेल्या ग्राहकांची सार्वजनिक शौचालयाच्या अभावामुळे कुचंबणा होते, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबद्दल लक्ष दिले पाहिजे. - प्रसाद जाधव, व्यावसायिकबसस्थानकाशेजारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; परंतु नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य केल्यास सुलभ शौचालय योजना तत्त्वावर अंमलबजावणी करणे शक्य होईल. तसेच नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल. - राजाभाऊ रणपिसे, सरपंच, निजामपूर ग्रामपंचायतज्येष्ठ नागरिकांना होतोय त्रासमाणगाव तालुक्यातील कुंभे, केळगण, जोर, बोरमाच, कुडूर्पेठ, थरमरी यांसारख्या दुर्गम डोंगराळ भागातून बरेचसे ज्येष्ठ नागरिकही बाजारपेठेमध्ये येत असतात. मात्र, स्वच्छतागृहाच्या गैरसोयीमुळे हैराण झालेले दिसून येतात, म्हणूनच ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी जातीने लक्ष देऊन, बस स्थानकाजवळ आणि मुख्य बाजारपेठेमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांच्या वतीने के लीआहे.