शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटातील शेतकऱ्यांचा थेट मार्केटिंगचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:50 IST

खारेपाटीतील तरुण शेतकऱ्यांनी ‘डायरेक्ट मार्केटिंग’ तंत्र स्वीकारून मत्स्यशेतीचा पर्याय स्वीकारला आहे

- जयंत धुळप अलिबाग : खारेपाटीतील तरुण शेतकऱ्यांनी ‘डायरेक्ट मार्केटिंग’ तंत्र स्वीकारून मत्स्यशेतीचा पर्याय स्वीकारला आहे. खवय्ये पर्यटकांकडून मागणीही वाढली आहे. याशिवाय खारेपाटाची आगळी ओळख असणारा गोड चवीचा पांढरा कांदादेखील थेट मुंबई-पुण्याच्या मॉलमध्ये ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.‘गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. खारेपाटातील शेतकºयांनी उधाणामुळे नापीक झालेल्या भातशेतीत भात, आंबा, तोंडली, पांढरा कांदा यांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न चार पिढ्यांपासून चालविला आहे, तर गेल्या पाच-सहा वर्षांत येथील तरुण पिढी मत्स्यशेती करू लागली आहे, त्यामुळे आता खारेपाटातील शेतकºयांना सरकारी योजनांवर अवलंबून न राहता स्वबळावर नवा अर्थप्राप्तीचा स्रोत सुरू करण्यात यश आले आहे.शहापूर-धेरंड परिसरातील जमीन रिलायन्स पॉवर प्रोजेक्टकरिता संपादित करण्याची प्रक्रिया ज्या वेळी सुरू झाली, त्या वेळी विरोध न करता, शहापूरमधील आदर्श मित्रमंडळाच्या तरुणांनी विरोध करण्याऐवजी तब्बल ६५ तलाव शहापूर-धेरंड गावात खोदून मत्स्य शेती सुरू केली. खारेपाटातील जिताडा माशाची मागणी वाढल्याने किमान ७०० रुपये किलो या दराने त्याची विक्री होऊ लागली. पर्यटकांच्या पसंतीस हा मासा उतरला.याच परिस्थितीचा तरुण शेतकºयांनी अभ्यास करून गावातील जिताडा मासा क्षेत्र हा पर्यटनाचाच भाग बनवून टाकण्याचा निर्णय घेतला. शहापूर-धेरंड ही दोन्ही गावे पेण- वडखळ-अलिबाग मार्गावर पेझारी नाक्यावरून सुमार आठ कि.मी.वर आतल्या बाजूला आहेत. परिणामी, मुंबई-पुणे येथील पर्यटक वाट वाकडी करून गावात येणे कठीण तर शेततलावापर्यंत रस्ते नसल्याने तेथे पर्यटक पोहोचू शकत नाहीत, हे लक्षात घेऊ न तरुणांनी वडखळ-अलिबाग राज्यमार्गावर पळी येथे धाबा सुरू केल्याची माहिती आदर्श मित्रमंडळाचे सदस्य समीर पाटील यांनी दिली.महिलांना रोजगार संधीयेत्या काही दिवसांत खारेपाटातील विशिष्ट चवीचा तांदूळ, मसाले, लोणची, वालदेखील तेथे विकण्याकरिता विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यातून महिलांना घरोघर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अगोदर मागणी केल्यास मत्स्यशेतीतील मासेही मुंबई-पुणे येथील खवय्यांना उपलब्ध करून देण्याकरिता तरुणांचे नियोजन आहे.अलिबागचा पांढरा कांदा मॉलमध्येखारेपाटातील गोड पांढरा कांदा हा त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध असून त्याला मोठी मागणी आहे. याचाच विचार करून यंदा अलिबागमधील पांढरा कांदा मुंबई, ठाणे आणि पुणे शहरातील मॉल्समध्ये पाठविण्यासाठी अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील सतीश म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तयारी सुरू केली आहे.तीन एकर शेतजमिनीत पांढºया कांद्याची लागवड केली असून, सुमारे ३५ ते ४० टन उत्पादन अपेक्षित आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा पांढरा कांदा विक्रीकरिता मुंबई, पुणे व ठाणे येथील मोठ्या मॉल्समध्ये पाठविण्यात येणार आहे. लागवडीपासून उत्पादन मिळेपर्यंत खते, औषधे, मजूर आदीवरील सुमारे दोन लाखांचा खर्च वजा जाता, तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नफा मिळणे अपेक्षित असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीalibaugअलिबाग