रुंदीकरणामुळे दिघी पोर्ट, पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:49 PM2019-01-04T23:49:09+5:302019-01-04T23:49:14+5:30

दिल्ली मुंबई कॉरिडोर प्रकल्पात समावेश असलेल्या दिघी पोर्टला जोडणाऱ्या माणगाव - दिघी मार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे.

 Dighi port due to widening, driving tourism | रुंदीकरणामुळे दिघी पोर्ट, पर्यटनाला चालना

रुंदीकरणामुळे दिघी पोर्ट, पर्यटनाला चालना

Next

दिघी : दिल्ली मुंबई कॉरिडोर प्रकल्पात समावेश असलेल्या दिघी पोर्टला जोडणाऱ्या माणगाव - दिघी मार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे व रुंदीकरणाच्या कामामुळे चालकांना त्रास होत असला तरी नवीन रस्ता होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
गेली कित्येक वर्षे माणगाव ते दिघी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येत होते. आता माणगाव ते दिघी दरम्यानच्या मोर्बे, डोंगरोली, साई, घोणसे घाट, म्हसळा, सकलप, मेंदडी अशा ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. कामामुळे चालक त्रस्त झाले असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
माणगाव ते दिघीपर्यंतच्या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागत असल्याचे एमएसआरडीसीचे अधिकारी सांगतात. माणगावपासून म्हसळा बायपास ते दिघी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची डागडुजी केल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास स्थानिकांना आहे.

पर्यटक गोरेगाव मार्गे
माणगाव ते म्हसळा मार्गादरम्यान ठिकठिकाणी रुं दीकरणास सुरु वात झाली आहे. काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. शिवाय धुळीचाही त्रास वाढला आहे. त्यामुळे पुणे व इतर ठिकाणाहून दिवेआगर, श्रीवर्धन व मुरूड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी माणगाववरून साई मार्गे जाण्याऐवजी लोणेरे गोरेगाव-म्हसळा या मार्गाला पर्यटकांकडून पसंती दर्शवण्यात येत आहे.

पुणे-मुळशी-माणगाव-दिघी या रस्त्याचा आता राष्ट्रीय महामार्ग बनला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून सध्या रस्त्याचे रुं दीकरण होत आहे. दिवेआगर येथील आल्हाददायक निसर्गाच्या भेटीने कुटुंब सुखावले. मात्र, रस्त्याच्या कामामुळे प्रवास त्रासदायक ठरला. रस्त्याचे काम लवकरच पूर्ण झाल्यास परत परत श्रीवर्धनकडे भटकंती करण्याचा उत्साह वाढणार आहे.
- विवेक नकाते, पर्यटक.

माणगाव ते दिघी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असल्याने पर्यटनावर परिणाम होत आहे. रुंदीकरणामुळे औद्योगिक क्षेत्र दिघी पोर्ट व दिवेआगर पर्यटनात वाढ होऊन रोजगाराला चालना मिळेल.
- भावेश जैन, स्थानिक व्यावसायिक

दिघी-माणगाव मार्ग बनत असल्याने तालुक्यातील खड्डेमय खिळखिळ्या प्रवासातून सुटका होणार आहे. परिणामी वाहनांमधील बिघाड होण्याची समस्या दूर होईल.
- प्रवीण वडके, रिक्षाचालक, बोर्लीपंचतन

Web Title:  Dighi port due to widening, driving tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.