शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वाढलेल्या झाडीमुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:32 IST

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील.

दासगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील. शासन गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा करीत असला, तरी हा दावा महाड परिसरात फोल ठरताना दिसत आहे. महाडमधून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गालगत दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. यामुळे महामार्गाची साइडपट्टी दिसत आहे. तर दासगाव, वहूर, टोळ, वीर परिसरात साइडपट्टीवरील टाकण्यात आलेली अनावश्यक खडी, दगडे अपघातांना निमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या या प्रश्नाकडे महामार्ग पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.कोकणवासीयांसाठी शिमगा आणि गणेशोत्सव या दोन सणाला अधिक महत्त्व आहे. चाकरमानी जगाच्या कोणत्याही कोपºयात असला, तरी गावातील या दोन सणांसाठी गावाकडे परत येतो. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, आठ ते दहा तासांची वाहतूककोंडी, अपघाताची भीती, आबालवृद्धांना होणारा त्रास, अशी अनेक संकटे पार करत चाकरमानी कोकणात पोहोचतोच. महाड तालुका हद्दीतून सुमारे २५ कि.मी.चा मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गाचा आढावा घेतला असता, मुळातच हा महामार्ग अरुंद आहे. औद्योगिक वसाहत आणि स्थानिक पातळीवरील वाहनांची संख्यादेखील अधिक आहे.गणेशोत्सवासाठीच्या वाहनांची संख्या या महामार्गावर वाढल्यानंतर वाहतूककोंडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे इतर भागांप्रमाणे या महामार्ग परिसरात लक्ष घालणे गरजेचे आहे. असे असतानादेखील महामार्गाच्या साइडपट्टीवरील वाहतुकीला अडथळा ठरलेली झाडी-झुडपे अद्याप काढलेली नाहीत. यामुळे या झाडी-झुडपांचा वाहतुकीला त्रास होत आहे. त्याचप्रमाणे या झाडी-झुडपांमुळे साइडपट्टी देखील बेपत्ता झाली आहे. साइडपट्टी दिसून न आल्यामुळे वाहनचालकांना गाड्या थांबविण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे.>वाहतूक वळवण्याकडे प्रशासनाचा कलगेली दोन दशके मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. १० वर्षांपूर्वीपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग अरुंद आणि खड्ड्यांनी भरलेला होता, तर नजीकच्या काळात चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पुरती वाट लागली आहे. रस्ता रुंद झाला असला, तरी रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.पनवेल ते इंदापूरदरम्यान रस्ता शिल्लकच नाही, अशी अवस्था आहे. महाड-पोलादपूर मार्ग कोकणात जाणारा हा मुंबई-गोवा महामार्ग जवळचा असूनदेखील गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवकाळात प्रशासन तळकोकणात जाणारी वाहतूक पुणेमार्गे कराड, चिपळूण-आंबोली घाटमार्ग रत्नागिरी वळवण्याकडे सर्वाधिक कल आहे.हा मार्ग चांगला असला तरी प्रवास वाढतो आणि घाटदेखील वाढत आहे. महाड-पोलादपूर मार्गे जाणाºया रस्त्यावर सुविधा देण्याऐवजी प्रशासन उत्सवकाळातील वाहतूक घाटमार्गे वळवण्यात मग्न आहे. मात्र, यामुळे चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्यासाठी वेळही जास्त लागतो तर वाढलेल्या अंतरामुळे खिशाला चापही बसत आहे.वीर, टोल, दासगाव, वहूर या परिसरांत अनेक ठिकाणी महामार्गाच्या साइडपट्टीवर वाळू उत्खननातून निघालेली टाकाऊ खडी (रेजगा) टाकून देण्यात आला आहे. हा रेजगा कोणत्याही परिस्थितीमध्ये गच्च बसणारा नाही. यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते.रेजगा टाकलेला खड्डा अगर साइडपट्टी लांबून दिसताना समतल दिसला तरी गाडीचे चाक जेव्हा या ठिकाणी जाते, त्या वेळी हा रेजगा बाजूला होऊन चाक पूर्ण खड्ड्यात जाते. छोटी चारचाकी वाहने अशी परिस्थिती अनियंत्रित होऊ शकतात.तर दुचाकी वाहन अपघातग्रस्त होण्याची शक्यता पूर्ण असते. यामुळे साइडपट्टीवरून रेजगा हलवणे गरजेचे आहे. अपघाताला निमंत्रण देणाºया या साइडपट्टीवरील रेजग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.>महामार्गालगत गवताचे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे साइडपट्टीवर टाकाऊ खडी (रेजगा) पडलेली आहे. गणपती सणासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांच्या वाहनांना अडचण निर्माण होऊ नये. यासाठी हे अडथळे दोन दिवसांत दूर करण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाला लेखी पत्राद्वारे कळविण्यात येईल.- एस. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा महामार्ग महाड केंद्र