शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नोकरी, व्यवसाय आणि रेल्वे स्थानकाच्या नाव बदलण्यासाठी धुतुम ग्रामस्थांचा सिडको, रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्चला मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:09 IST

Uran News: धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सिडको आणि रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्च रोजी  मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

- मधुकर ठाकूरउरण  - धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शेमटीखार येथील रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात यावे, तसेच सदर रेल्वे स्थानकात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सिडको आणि रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्च रोजी  मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता  ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली धुतूम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी चर्चा करताना सांगितले की लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या १९८४ सालच्या शेतकरी लढ्यात धुतूम गावातील शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.या लढ्यात धुतूम गावातील शेतकरी रघुनाथ अर्जुन ठाकूर यांना वीरमरण  आले होते.अशा हुतात्म्यांच्या बलिदानानी पावन झालेल्या धुतूम गावातील मौजे शेमटीखार येथे सिडको आणि रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानक उभारत आहे.त्या रेल्वे स्थानकाला धुतूम रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे यासाठी वारंवार सिडको आणि रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे.

परंतु सिडको आणि रेल्वे प्रशासनाने धुतूम रेल्वे स्थानक असे नाव न देता रांजणपाडा रेल्वे स्थानक नाव देऊन धुतूम गावातील हुतात्म्यांच्या बलिदानाची थट्टा करुन धुतूम गावाचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला आहे.हे  कदापी सहन करणार नाहीत.त्यामुळे रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात यावे, तसेच सदर रेल्वे स्थानकात धुतूम गावातील बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात जागा उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीसाठी सिडको आणि रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्च २०२३ रोजी  मार्चा काढण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

यावेळी सरपंच  सुचिता  ठाकूर, उपसरपंच कविता ठाकूर,माजी सरपंच अमुत ठाकूर,माजी सरपंच शंकर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर,प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर,रविनाथ ठाकूर, सुचिता कडू,स्मिता ठाकूर,अनिता ठाकूर,कमळाकर पाटील,माजी उपसरपंच शरद ठाकूर,काँग्रेस गाव अध्यक्ष शंकर ठाकूर, रामनाथ ठाकूर,कुष्णा ठाकूर,शंकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कडू,अरुण ठाकूर, उद्योगपती नारायण ठाकूर, ग्रामसेवक विलास म्हात्रे आदींसह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधीच बोकडवीरा,नवघर ग्रामस्थांनी स्थानकांची नावे बदलण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.त्यामध्ये नव्याने धुतुम ग्रामस्थांची भर पडली आहे.

टॅग्स :Raigadरायगड